गोवर - रुबेला लसीकरणनंतर वर्धा जिल्ह्यात 3 मुलींना रिअॅक्शन, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचे आवाहन
महाराष्ट्रामध्ये 27 नोव्हेंबर पासून गोवर - रुबेला लसीकरण (Measles-Rubella Vaccination) मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे.
महाराष्ट्रामध्ये 27 नोव्हेंबर पासून गोवर - रुबेला लसीकरण (Measles-Rubella Vaccination) मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. राज्यातून गोवरचे निर्मुलन आणि रुबेला आजारावर नियंत्रण मिळवण्याचा सरकारचा मानस आहे. मात्र पहिल्याच दिवशी लसीकरणानंतर 3 विद्यार्थींनींमध्ये रिअॅक्शन झाल्याची घटना वर्धा जिल्ह्यात समोर आली आहे.
वर्धा जिल्ह्यामध्ये खरांगणा येथील दहावीत शिकणार्या दोन मुलींमध्ये तर आंजी येथील एका विद्यार्थीनीमध्ये रिअॅक्शन झाल्याचे समोर आले आहे. हा त्रास AEFI म्हणजेच (Adverse events following immunization )चा होता. यामध्ये संबंधित मुलींना श्वास घेण्यास त्रास होत होता, अंगावर पुरळ यायला सुरूवात झाली. तात्काळ मुलींना स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी देखील लसीकरणाच्या दुष्पपरिणामांच्या बातमीचे, शारीरिक दुर्बलता येत असल्याच्यागोष्टीचं खंडन केले आहे. गोवर रुबेला लसीकरण सुरक्षित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता मुलांना लस द्यावी असे आवाहन केले आहे.
लहान मुलांमध्ये रूबेला (Rubella) आणि गोवर (Measles) या आजारामुळे भविष्यात होणार्या विकासावर त्याचा परिणाम होतो. महराष्ट्र सरकारने 9 ते 15 वयोगटातील सुमारे 3 कोटी 38 लाख मुलांना गोवर रूबेला लसीकरण देण्याचं उद्दिष्ट बनवले आहे. गोवर-रुबेला लसीकरण मोहीम आजपासून सुरु; ३.३८ कोटी बालकांना लाभ देण्याचे आरोग्य विभागाकडून उद्दिष्ट
गोवर रुबेला लसीकरण कुठे केले जाणार आहे ?
गोवर रूबेला लसीकरणाची सोय महाराष्ट्रभर शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी दवाखाने येथे मोफत लसीकरणाची सोय खुली करण्यात आली आहे.
गोवर आणि रूबेला हे दोन्ही संसर्गजन्य असल्याने वातावरणात झपाट्याने त्याचा प्रसार होण्याची शक्यता असते. खोकला, शिंकण्यातून व्हायरस वार्याच्या मदतीने वातावरणात पसरतात.
गोवर आणि रूबेला लक्षण
गोवर (Measles) हे व्हायरल इंफेक्शन असून यामध्ये हाय ग्रेड फिव्हर म्हणजे फणफणता ताप, डोळे लाल होऊन पाणी वाहणं, कफ, नाका वाहण अशी लक्षण दिसतात. वेळीच गोवरकडे लक्ष न दिल्यास यामधून आंधळेपणा, डायरिया, फुफ्फुसांचं इंफेक्शन जडण्याची शक्यता असते.
रुबेला (Rubella) हे देखील व्हायरल इंफेक्शन आहे. यामध्ये सौम्य प्रतीचा ताप, डोळे लाल होणं,कफ, नाक गळणं अशी लक्षणं दिसतात. गरोदर स्त्रियांमध्ये रूबेला जडल्यास तर त्याचा गर्भाच्या वाढीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
गोवर (Measles) आणि रूबेला (Rubella) या आजारातून लहान मुलांमध्ये गंभीर आजार जडल्यास त्यातून निर्माण होणार्या समस्या या अधिक गंभीर आणि धोकादायक असतात. त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं कठीण होऊन बसतो परिणामी मुलांना आयुष्यभर परिणामांचा सामना करावा लागतो.