केंद्राकडून महाराष्ट्र सरकारला आतापर्यंत 28 हजार 104 कोटींची मदत- देवेंद्र फडणवीस
नुकतीच भाजप नेते आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकार परिषद पार पडली आहे
कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) आणि केंद्र सराकार (Central Government) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. नुकतीच भाजप नेते आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकार परिषद पार पडली आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला कोरोना विषाणूच्या काळात निधी उपलब्ध करुन दिला नाही, असा आरोप केला जात आहे. आत्तापर्यंत 5 हजार कोटींपेक्षा जास्त पैसे राज्याला दिले आहेत. मात्र, केंद्राने काहीही दिलेच नाही असे ठाकरे सरकारकडून भासवले जात आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. केंद्राने राज्य सरकारला पीपीई किट, N-95 मास्क यांचाही पुरवठाही केला आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. आत्तापर्यंत 28 हजार 104 कोटींचा निधी केंद्राने राज्य सरकारला उपलब्ध करुन दिला आहे, असेही फडणवीस म्हणाले आहेत.
कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाली आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरत भाजपने महाराष्ट्र बंदचे आंदोलन पुकारले होते. यातच देवेद्र फडवीस यांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला आतापर्यंत मिळलेली आर्थिक मदतीची यादी जाहीर केली आहे. हे देखील वाचा- सांगली-कोल्हापूर महापूर पूनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाला सूचना; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापनाचा मान्सूनपूर्व आढावा
देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले मुद्दे-
- महाराष्ट्रातून ६०० ट्रेन्स सोडल्या आहेत.
- श्रमिक रेल्वेसाठी 300 कोटी दिले आहेत.
- मजुरांच्या छावण्यांसाठी 1 हजार 611 कोटींचा निधी दिला आहे.
- पीपीई आणि एन 95 मास्क यांचा पुरवठा केला आहे.
- शेतीसाठी 9 हजार कोटींचा निधी दिला
- एप्रिल आणि मे महिन्याचा निधी आगाऊ दिला आहे.
- गरीब कल्याण पॅकेजच्या अंतर्गत 1750 कोटींचा गहू, 2610 कोटींचा तांदूळ, 100 कोटींची डाळ दिली गेली आहेत.
- जनधन योजनेचे 1308 कोटी दिले गेले आहेत.
- उज्ज्वला अंतर्गत 1625 कोटींची मदत केली आहे.
ट्वीट-
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूमुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहे. मात्र, अद्यापही कोरोना विषाणूबाबत सकारात्मक बदल दिसून न आल्याने नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. देशात कोरोनाबाधितांसह कोरोनामुक्त होणाऱ्या संख्येतही वाढ होत आहे. यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.