World Autism Awareness Day: जाणून घ्या काय आहे ऑटिझम आजार, त्याची लक्षणे आणि उपाय
ऑटिझम म्हणजेच स्वमग्नता म्हणजे नेमके काय ते माहीत नसल्यामुळे अशा मुलांना अनेकवेळा ‘मतिमंद’ समजले जाते, परंतु मतिमंद आणि ऑटिझम यात बराच फरक आहे.
आज जागतिक ऑटिझम अवेअरनेस डे (World Autism Awareness Day) साजरा केला जात आहे. ऑटिझम हा बालपणात मज्जातंतूंच्या विकासाशी (न्युरो डेव्हलपमेंट) संबंधित विकार आहे. मेंदूतील काही भागांच्या अकार्यक्षमतेमुळे या मुलांची मानसिक क्षमता विकसित होत नाही. यामुळे अर्थबोध, विचार करण्याची क्षमता, वाचा, संवाद साधणे व वागणे यात समस्या निर्माण होतात. ऑटिझम म्हणजेच स्वमग्नता म्हणजे नेमके काय ते माहीत नसल्यामुळे अशा मुलांना अनेकवेळा ‘मतिमंद’ समजले जाते, परंतु मतिमंद आणि ऑटिझम यात बराच फरक आहे.
लक्षणे –
> आजूबाजूच्या गोष्टींवर प्रतिक्रिया न देणे
> भाषा समजायला अवघड जाणे
> स्वतःच्या विश्वात हरवणे
> बोलण्याऐवजी विचित्र आवाज काढणे
> इतरांच्या तुलनेत फार शांत आणि गप्प राहणे
या रोगाने पीडित लहान मुलांचा विकास इतरांच्या तुलनेत हळूहळू होतो. कारण यात त्यांचा मानसिक विकास योग्य पद्धतीने होत नाही. मात्र लहान वयात याचे निदान झाल्यास आक्युपेशनल थेरपीस्ट, स्पीच थेरपीस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिकल थेरपीस्ट अशा बहुविद्याशाखीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे अशा मुलांचे आयुष्य अधिक सुखकर बनवता येणे शक्य आहे. कधी कधी जनुकीय, अर्भकावस्थेतील गुंतागुंत, आईची जीवनशैली व तणावाचे प्रमाण हेही या विकारास कारणीभूत ठरू शकते. (हेही वाचा: स्पेन बनला जगातील सर्वात Healthy देश; श्रीलंका, बांग्लादेशनंतर भारत, मिळाले 120 वे स्थान)
उपाय -
> स्वमग्न मुलांमध्ये नवनवीन कौशल्ये, संवाद-क्षमता, सुसंगत हालचाली, निर्णय क्षमता आणि समस्यांची उकल करण्याची क्षमता विकसित करण्यावर त्यांच्या पालकांनी भर द्यायला हवा
> ऑटिस्टीक मुलांना नुसतेच शाळेत घालून उपयोग नसतो, प्रत्येक मुलाची क्षमता, कल लक्षात घेऊन त्याप्रमाणे शिक्षण देणे आवश्यक ठरते.
> शैक्षणिक विकास पद्धती, कल्पकतेचा वापर करून शिकवावे लागते.
> अशा मुलांशी संयमाने वागा. त्यांना सतत गोष्टी, गाणी ऐकवा. त्यांच्याशी सतत बोलत राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे ही मुले समाजात मिसळण्यास मदत होईल.
> ऑटिस्टिक मुले काही विशिष्ट रंग किंवा आवाज टाळतात. त्याच्याशी संपर्क आल्यास मुले हिंसक बनतात. त्यामुळे अशा गोष्टींकडे विशेष लक्ष द्या.
एकूणच ह्या मुलांकरता, गरजेप्रमाणे मानसोपचार व मनोविकार तज्ज्ञांच्या बरोबरीने special educator, phsio-occupational therapist व speech therapist यांची आवश्यकता असते. या सर्वांनी दिलेल्या सूचनेनुसार सराव केल्यास त्याचा निश्चित फायदा विद्यार्थ्यांस होताना दिसून आला आहे. स्वमग्न मुलाच्या पालकांना 'निरामया' योजने अंतर्गत वैद्यकीय खर्च मिळू शकतो. आयकरात सवलत, प्रवास दरात सूट, शैक्षणिक सुविधा यांसारख्या गोष्टींचा फायदा मिळू शकतो.
(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.)
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)