IRCTC कडून सुरू होणार 29 ऑगस्टपासून Bharat Darshan Special Tourist Train;पहा त्यामध्ये काय काय असेल?
Bharat Darshan Special Tourist Train हैदराबाद, अहमदाबाद,Nishkalank Mahadev Sea Temple, अमृतसर, जयपूर आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी यांचा समावेश आहे
आयसीआरटीसी (IRCTC) कडून भारत दर्शन स्पेशल टुरिस्ट ट्रेन (Bharat Darshan Special Tourist Train) 29 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. यामध्ये हैदराबाद, अहमदाबाद,Nishkalank Mahadev Sea Temple, अमृतसर, जयपूर आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी यांचा समावेश आहे.या टूरची कॉस्ट अंदाजे 11 हजार 340 रूपये आहे. 29 ऑगस्टपासून सुरू होणारी ही टूर 10 सप्टेंबर पर्यंत असेल. नक्की वाचा: IRCTC Rupay SBI Card: कमी दरात बुक करा रेल्वे तिकीट, जाणून घ्या कार्ड फिचरबाबत.
आयआरसीटीसीच्या माहितीनुसार, ही ऑल इन्क्लुझिव्ह आणि मोस्ट अफोर्डेबल टूर आहे. यामध्ये देशातील अनेक महत्त्वाची पर्यटन स्थळं समविष्ट करण्यात आली आहेत.दरम्यान भारत दर्शन स्पेशल टुरिस्ट ट्रेन चं ऑनलाईन बुकिंग हे आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ऑनलाईन सोबतच हे बुकिंग IRCTC Tourist Facilitation Centre, झोनल ऑफिस, रिजनल ऑफिस याकडे देखील उपलब्ध असेल. (हेही वाचा, IRCTC आणि FHRAI पर्यटकांना स्वस्तात हॉटेल बुकींग करण्यासाठी करणार मदत ; पहा ही खास ऑफर).
भारत दर्शन स्पेशल टुरिस्ट ट्रेन पॅकेजमध्ये काय असेल?
- स्लीपर क्लास प्रवास
- नाईट स्टे, धर्मशाळा/ हॉल मध्ये मल्टी शेअरिंग बेस वर
- सकाळचा चहा/ कॉफी, ब्रेकफास्ट, लंच, डिनर आणि 1 लीटर पाणी (प्रतिदिन)
- नॉन एसी रोड ट्रान्सफर
- टूर एस्कॉर्ट
- ट्रॅव्हल इंश्युरंस
- सॅनिटायझेशन कीट
दरम्यान ही टूर मदुराई मधून सुरू होणार आहे. बोर्डिंग स्टेशन मदुराई, दिंडिगुल,कारूर, ईरोड,सालेम,जोलारपेट्टीई, काटपेडी, एमजीआर चैन्नई सेंट्रल, नेल्लोरे, विजयवाडा आहे.
भारत दर्शन स्पेशल टुरिस्ट ट्रेन मध्ये प्रवेशासाठी पर्यटकांना लसीकरण प्रमाणपत्र किंवा आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट सोबत ठेवणं आवश्यक आहे. प्रवासादरम्यान मास्क घालणं आवश्यक आहे.