Goa Tourism: उद्यापासून गोवा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज; 250 हॉटेल्ससाठी सरकारने दिली परवानगी, फिरायला जाण्याआधी जाणून घ्या नियम

त्यावेळी ताबडतोब महत्वाचा निर्णय घेत सरकारने देशव्यापी लॉक डाऊन (Lockdown) जाहीर केले होते. आता तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ हे लॉक डाऊन सुरु आहे.

Goa tourism. (Photo Credit: Facebook)

देशात मार्चपासून कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीने मूळ धरायला सुरुवात केली होती. त्यावेळी ताबडतोब महत्वाचा निर्णय घेत सरकारने देशव्यापी लॉक डाऊन (Lockdown) जाहीर केले होते. आता तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ हे लॉक डाऊन सुरु आहे. याचा सर्वात फटका बसला आहे तो पर्यटन व्यवसायाला (Tourism). त्यात गोव्या (Goa) सारख्या राज्याची तर अवस्था आणखीनच बिकट आहे. आता देशातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक गोवा येथे पुन्हा पर्यटन व्यवसाय सुरु करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. हे किनारपट्टीवरील राज्य उद्यापासून, म्हणजे 2 जुलै, गुरुवारपासून पर्यटकांसाठी पुन्हा सुरू होणार असल्याची घोषणा राज्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर (Manohar Ajgaonkar) यांनी बुधवारी केली.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मार्च महिन्यात देशव्यापी लॉकडाउन लागू केल्यापासून, गोव्यात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. आज अजगावकर म्हणाले की, 'राज्यातील पर्यटन उपक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.'

मात्र यासाठी काही नियम घालून देण्यात आले आहे -

यापूर्वीच गोव्यातील दाबोलिम विमानतळावर चार्टर्ड प्लेनच्या स्लॉट बुकिंगची प्रक्रिया सुरू झाली असून, ऑक्टोबरपासून परदेशी पर्यटक राज्यात येऊ शकतील. दरम्यान, गेल्या शनिवारीच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले होते की, राज्यात कोरोनाचा सामुदायिक प्रसार सुरु झाला आहे, म्हणूनच राज्याच्या प्रत्येक भागातून कोरोना विषाणू संसर्गाची प्रकरणे समोर येत आहेत. अशात आता राज्य सरकारने पर्यटन व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.