मुलींच्या या गोष्टींकडे मुले चटकन होतात आकर्षित
मुलींच्या अशा गोष्टी ज्या मुलांना आकर्षित करतात किंवा मुलांवर प्रभाव पाडतात.
नेहमीच असे म्हटले जाते की मुली आपला जोडीदार फारच विचार करून, पारखून निवडतात. मात्र याबाबतील आजकाल मुलेही फार चोखंदळ झाली आहेत. आपल्या जोडीदाराची निवड करण्याआधी मुले अनके गोष्टींकडे लक्ष देतात, निरीक्षण करतात. मुलींच्या छोट्या छोट्या गोष्टीही आजकालच्या मुलांच्या नजरेतून सुटत नाहीत. चला तर पाहूया मुलींच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मुलांना आकर्षित करतात किंवा मुलांवर प्रभाव पाडतात.
> सहसा असे समजेल जाते की तुमचे हसणे हे तुमच्या शब्दांपेक्षा जास्त समोरच्यावर प्रभाव पाडते. तुमच्या हसण्याने तुम्ही कोणाच्याही काळजात स्वतःचे घर बनवू शकता. म्हणूनच मुले मुलींच्या क्युट हसण्यावर फिदा होतात. मुलीची एक स्माईल मुलाचे काळीज खलास करून टाकण्यास कारणीभूत ठरू शकते
> आजकालच्या मॉडर्न मुलांना आत्मविश्वासू मुली फार पसंत असतात. परिस्थितीनुसार कसे वागावे बोलावे हे ज्या मुलींना समजते त्या मुलींकडे मुले आकर्षित होतात.
> भलेही मुले ही गोष्ट बोलून दाखवत नसतील मात्र, मुलींची ड्रेसिंग स्टाईल एखादे नवे नाते जोडताना फार महत्वाची ठरते. इतर मुलीना कॉपी न करता स्वतःची अशी वेगळी स्टाईल निर्माण करणाऱ्या मुली मुलांना फार आवडतात. तसेच स्थळाचे भान ठेऊन स्वतःला कॅरी करणाऱ्या मुली तर पहिल्याबरोबरच मुलांच्या नजरेत भरतात.
> डोळ्यांना व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा आरसा म्हटले जाते. मुलांना आकर्षित करून घेण्यासाठी मुलींचे डोळेही फार महत्वाची भूमिका बजावतात. मुलांना मुलींचे सुंदर आणि आकर्षित डोळे फार पसंत असतात.
> भलेही मुले स्वतः कसेही असोत मात्र ते मुलींच्या परफ्युमपासून ते त्यांच्या मेकअपपर्यंत सर्व गोष्टींचे अगदी बारकाईने निरीक्षण करतात. मुलींच्या कपड्यांचा आणि केसांचा सुगंध मुलांना फारच प्रभावित करतो, इतके की फक्त वासावरून ते मुलींना ओळखू शकतात.
> सध्याच्या स्पर्धेच्या युगात मुलांना स्वतःच्या मतांवर ठाम असणाऱ्या, समजून घेणाऱ्या आणि विचारांच्या बाबतील गुंतागुंत नसणाऱ्या मुली आवडतात. प्रत्येक बाबतीत पुरुषावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वावलंबी मुलींना जोडीदार म्हणून मुलांची पसंती जास्त असते.