Surya Grahan 2021: वर्षातील अखेरचे सुर्यग्रहण कधी? जाणून घ्या अधिक

Photo Credit: Pixabay

यंदाच्या वर्षातील अखेरचे सूर्यग्रहण येत्या 4 डिसेंबरला लागणार आहे. चंद्रग्रहणाप्रमाणेच सुर्यग्रहण सुद्धा एक महत्वपूर्ण खगोलीय घटना आहे. ज्योतिषात ग्रहण हे अशुभ घटना असल्याचे मानले जाते. याच कारणामुळे ग्रहणादरम्यान शुभ कार्य आणि पूजा करणे टाळतात. तर जाणून घ्या सुर्यग्रहणामुळे काय प्रभाव पडतो.(Chandra Grahan November 2021 Live Streaming: शतकातलं सर्वात मोठ्या कालावधीचं चंद्रग्रहण आज; इथे पहा लाईव्ह)

ज्योतिषाचार्य डॉ. अरविंद मिश्र यांनी असे म्हटले की, चंद्रग्रहणानंतर वर्षातील अखेरचे सुर्यग्रहण 4 डिसेंबर 2021 रोजी लागणार आहे. या दिवसी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या आहे. सुर्यग्रहण 4 डिसेंबरला सकाळी 10 वाजून 59 मिनिटांनी सुरु होणार आहे. ते दुपारी 03 वाजून 07 मिनिटांनी समाप्त होणार आहे.

वर्षातील अखेरचे सुर्यग्रहण हे अंटार्टिका, दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेत दिसणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही आहे. त्यामुळे याचा सुतक काळ मान्य नसणार आहे. तर सुर्यग्रहणाच्या 12 तासांपूर्वी सूतक सुरु होते. हे ग्रहण उपछाया असणार आहे. ज्योतिष शास्रानुसार, पूर्ण ग्रहण झाल्यानंतरच सुतक काळ मान्य होतो. आंशिक किंवा उपछाया असल्यास सूतक नियमांचे पालन अनिवार्य नसते.(Ayodhya Deepotsav 2021: अयोध्यामध्ये पार पडला दीपोत्सवाचा कार्यक्रम; तब्बल 12 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी, झाला विश्वविक्रम Photo & Videos)

वर्षातील अखेरचे चंद्रग्रहण हे 19 नोव्हेंबरला होता. तर 15 दिवसांच्या आतमध्ये हे दुसरे ग्रहण आहे. ज्योतिष शास्रात ऐवढ्या कमी वेळात पडणाऱ्या ग्रहणाला अशुभ मानतात.