Sex Tips: महिलांंनो सेक्स करताना Orgasm मिळवण्यात या 7 गोष्टी ठरु शकतात अडथळा, कसा कराल उपाय?
सेक्सची प्रक्रिया जितकी भन्नाट असते त्याहीपेक्षा तो परमोच्च क्षणाचा अनुभव बराच खास असतो. तुमच्या काही सवयी किंंवा शारिरिक कमतरतांंमुळे तुम्ही या अनुभवापासुन वंचित राहताय अशी ही शक्यता आहे. आता काय आहेत या सवयी व त्यावर काय उपाय करता येईल हे आजच्या या लेखातुन आपण पाहणार आहोत.
Sex Tips: 'सफर खुबसुरत है मंंजील से भी' हा फिल्मी डायलॉग आपण ऐकला असेल, पण सेक्सच्या बाबत हेच खरंं आहे असे म्हणता येणार नाही, सेक्सची प्रक्रिया जितकी भन्नाट असते त्याहीपेक्षा तो परमोच्च क्षणाचा अनुभव बराच खास असतो. वास्तविक पुरुष आणि महिला दोघांंसाठी ही या क्षणाची मजा तितकीच समान असते मात्र बर्याचदा पुरुषांंना एकट्यालाच हा अनुभव मिळतो आणि बिचारी महिला मात्र वाटच पाहत राहते. चुकीचं आहे ना? असं होउ नये यासाठी या मागची कारणं समजुन घ्यायला हवीत.अनेकदा आपल्या पार्टनरच्या स्टॅमिनाला बोल लावुन अशा प्रकारात महिला मोकळ्या होतात मात्र खरंं पाहायचं तर तेवढंच कारण नाहीये, तुमच्याही काही सवयी किंंवा शारिरिक कमतरतांंमुळे तुम्ही या अनुभवापासुन वंचित राहताय अशी ही शक्यता आहे. आता काय आहेत या सवयी व त्यावर काय उपाय करता येईल हे आजच्या या लेखातुन आपण पाहणार आहोत.
ऑक्सीटोसिन कमी असणे
सेक्स तज्ञांंच्या माहितीनुसार, Orgasm साठी ऑक्सीटोसिन हे हार्मोन तुमच्या शरिरात मुबलक प्रमाणात निर्माण होणे आवश्यक आहे. सेक्स दरम्यान जाणवणारी उत्तेजना सुद्धा यावरच अवलंंबुन असते. त्यामुळे सेक्सच्या आधी फोरप्ले करण्याला विशेष महत्व आहे, यामुळे शरीरातील या हार्मोन चा प्रवाह सुरु होतो आणी पुढे सेक्सची इच्छा वाढते.
सेक्स आधी Bladder Check
महिलांंनो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सेक्स आधी बाथरुमला नक्की जाउन या, यामुळे ब्लॅडर खाली होते आणि मग पेनिट्रेशन उत्तम होऊन पुढे Orgasm पर्यंत जाता येते. याशिवाय सेक्स नंंतर सुद्धा बाथरुमला आवश्य जावे यामुळे युरिनरी ट्रक मध्ये संसर्गाचा धोका कमी होतो.
Masturbetion ची टाळाटाळ
हस्तमैथुन करण्याबाबत अनेक महिला फार सकारात्मक नसतात. मात्र यामुळे तुमचे हार्मोन्स अॅक्टिव्ह होण्यास बरीच मदत होते या पद्धतीने आपण पार्टनरच्या शिवाय सुद्धा Orgasm मिळवु शकताच मात्र सेक्स करताना सुद्धा याची मदत होते. मात्र सेक्स च्या अगदी आधीच मास्टरबेशन करु नका त्यामुळे नंंतर इच्छा उरत नाही. महिलांनो केवळ Clitoris च नव्हे तर शरीराच्या 'या' भागांना सुद्धा स्पर्श करून मिळवू शकाल Orgasm
Urinary Track Infections
जर तुम्हाला युरिनरी ट्रक मध्ये संसर्ग असेल तर त्यामुळे सेक्सच्या वेळी जळजळ अधिक जाणवते. ही बाब पुढे गंंभीर होउ शकते,त्यामुळे वेळीच याबाबत डॉक्टरांंचा सल्ला घ्यावा. ज्या महिलांंमध्ये हार्मोन्सची कमी आहे (बहुतांंश वेळा स्तनदा मातांंना हा त्रास जाणवतो) त्यांंना सुद्धा योनीमध्ये जळजळीचा त्रास जाणवतो. या समस्यांंसाठी महिलांंनी आयुर्वेदिक पर्याय व जीवनशैलीत आवश्यक बदल करावेत.
सलग बसुन काम करणे
अलिकडे महिला अधिकांंश डेस्क जॉब करत असल्याने त्यांंना 8 ते 9 तास सलग बसुन राहावे लागते यामुळे पेल्विक स्नायु अगदी शक्तीहीन होतात परिणामी सेक्स वेळी सुद्धा त्यांंच्यातील सेंसिटिव्हिटी काम करत नाही. अशा महिलांंनी व्यायाम किंंवा निदान दर दोन तासांंनी 10 मिनिटांंचा वॉक जरुर करावा.
High Heels चा वापर
आपल्या फॅशन मधील आवडीनिवडी सुद्धा तुमच्या सेक्स लाईफ वर परिणाम करु शकतात. अनेक सर्व्हे मध्ये समोर आलेल्या माहितीनुसार उंंच टाचांंच्या चप्पल वापरणार्या महिला या Orgasm च्या बाबत अधिक तक्रारी करतात. यामागे एक कारण सुद्धा आहे. पायातील सोअस स्नायु हे पेल्विक नर्व्ह्ज ना जोडलेले असतात त्यामुळे उंंच हिल्स त्या नसांंवर ताण वाढवतात आणि मुख्य सेक्स वेळी Orgasm होउनही जाणीव होत नाही.
गर्भ निरोधक गोळ्यांंचा अतिवापर
गर्भ निरोधक गोळ्यांंमध्ये असणार्या प्रोलैक्टिन नामक रसायन असल्याने त्याचा सेक्स ड्राईव्ह वर परिणाम होतो, प्रत्येक वेळी सेक्सनंंतर या गोळ्या घेतल्यस हळुहळु इच्छाच संंपते आणि अशावेळी सेक्स केला तरी परमोच्च क्षण वैगरे पर्यंत पोहचल्यासही आनंंद होत नाहीच.
(टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, याबाबत अन्य शंका असल्यास डॉक्टरांशी सुद्धा बोलुन घ्या)
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)