National Boyfriend's Day: या '6' स्वभावाच्या गर्लफ्रेंड्स मुलांच्या डोक्याला ताप ठरतात !

जगभरात 3 ऑक्टोबरला जागतिक बॉयफ्रेंड्स डे सेलिब्रेट करण्याची प्रथा आहे.

रिलेशनशीप गोल्स Photo Credits : pexels.com

जसा मातृदिन, जागतिक महिला दिन, बालिका दिन साजरा केला तसाच जगभरात 3 ऑक्टोबरला जागतिक बॉयफ्रेंड्स डे सेलिब्रेट करण्याची प्रथा आहे. सामन्यपणे कोणत्याही रिलेशनशिपमध्ये मुलांनी नात्यामध्ये पुढाकार घ्यावा असा अलिखित नियमअसतो. किमान बॉयफ्रेंड्स डेच्या दिवशी मुलांना गिफ्ट देऊन त्यांच्या आयुष्यातील तो एक दिवस खास बनवला जातो. बॉयफ्रेंड्स डे प्रमाणे 1 ऑगस्टला गर्लफ्रेंड्स डे साजरा केला जातो.

रिलेशनशीप म्हटलं की नात्यामध्ये तडजोड ही येणारच पण अनेकदा मुलांचीही नात्यामध्ये होरपळ होत असते. यामागील एक कारण म्हणजे त्यांच्या गर्लफ्रेड्सचा स्वभाव आहे. मग पहा कळत नकळत कोणत्या स्वभावाच्या मुली बॉयफ्रेंड्ससाठी डोकेदुखी ठरतात.

1. नात्यामध्ये असल्यानंतर सहाजिकच आपण काही व्यक्तींबाबत पझेसिव्ह होतो. मात्र जेव्हा गर्लफ्रेंड्स त्यांच्या बॉयफ्रेडबाबत पझेसिव्ह असतात तेव्हा स्वतःची स्पेस न मिळाल्याने त्रागा होतो.

2. नात्यामध्ये 'इगो' आल्यानंतर अनेकदा ते नातं बिघडते. मुली स्वतःहून त्यांची चूक उमजूनही मान्य करत नसतील तर कायम मुलांनी पडती बाजू घेणं कठीण आहे.

3.प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार असतात. पण तुम्ही दोघं भेटल्यानंतर, बोलताना सतत ज्या मुली त्यांच्या आयुष्यातील टेन्शनची रडगाणी गात असतील तर ते नात्याला मारक आहे.

4.हेकेखोर किंवा स्वतःचच खरं असं म्हणणार्‍या मुलीदेखील विशिष्ट टप्प्यानंतर मुलांना नकोशा वाटतात. नेहमीच मुलींच्या मनासारख्या गोष्टी होणं शक्य नसतं.

5.मुलींचा संशयी स्वभावदेखील नात्याला नुकसानकारक असतो. प्रत्येकवेळी कुठे आहे? कोण बरोबर आहे? इमेल, मोबाईल, सोशल अकाऊंट चेक करत राहणं मुलांना नकोसे वाटते.

6.इमोशनल ब्लॅकमेल करणार्‍या गर्लफ्रेंड मुलांना एका टप्प्यानंतर नकोशा वाटतात. लहानसहान गोष्टींवरून सतत ब्लॅकमेल करणं हा स्वभाव नात्यामध्ये समतोल राखू शकत नाही.



संबंधित बातम्या