Sex Tips: एकत्रित कुटूंबामध्ये आपल्या जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी मदत करतील 'या' Sex Positions आणि काही खास टिप्स, जाणून घ्या सविस्तर
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : youtube)

आज आपल्या देशात आज अजूनही अशी काही घरे आहेत जिकडे एकत्रित कुटूंब पद्धती पाहायला मिळते. एकत्रित कुटूंबात जितकी भांडणे असतात तितके प्रेम, आपुलकी देखील पाहायला मिळते. मात्र या एकत्र कुटूंब पद्धतीमध्ये एक अडचण निर्माण होते ती म्हणजे पती, पत्नीसोबत सेक्स (Sex) कसे करायचे? हा प्रश्न जरी ऐकायला विचित्र वाटत असला तरीही समस्या अनेकांना उद्भवतही असेल. पण ते लोकांसमोर खुलेपणाने अनेकजण टाळतात. आपल्या जोडीदारासोबत मनासारखे सेक्स करता येत नसल्या कारणाने जोडप्याची अनेकदा चिडचिड होते, भांडणे होतात. कधी कधी सेक्स करताही येते मात्र ते करत असताना होणा-या प्रणयक्रिडा, आवाज या सर्व गोष्टींचा खूप काळजीपूर्वक विचार करावा लागतो.

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कुटूंबामध्ये आपल्या जोडीदारासोबत समाधानकारक सेक्स करण्यासाठी खालील प्रकारांची मदत घेऊ शकता.

1. डॉग स्टाईल (Modified Doggy Style)

बेड ऐवजी जमिनीवर डॉगी स्टाईल पोजिशनमध्ये तुम्ही सेक्स करु शकता, कारण बेडवर या पोजिशनमध्ये सेक्स केल्यास आवाज येण्याची शक्यता असते. त्याऐवजी जमिनीवर सेक्स करत असल्यास जमिनीवर चटई अवश्य अंथरा.

2. 69 स्टाईल (69 Pose)

ही सेक्स पोजिशन सर्वांसाठी सोयीची आहे. या पोजिशनमध्ये तुमचे शरीर जास्त हलत नाही आणि आवाजही जास्त होत नाही. Sex Tips: शारीरिक संबंध ठेवताना महिलांच्या परमोच्च सुखाविषयी तुम्हाला माहित आहे का या '5' गोष्टी ? जाणून घ्या सविस्तर

3. मिशनरी पोज (Missionary Pose)

ही सेक्स पोजिशन खूपच सामान्य आहे. या प्रकारात सर्वात जास्त वेग असणे आवश्यक आहे. या सेक्स प्रकारात दोन्ही पार्टनर्स कोणताही आवाज न करता एन्जॉय करु शकता.

4. लोटस पोज (Lotus Pose)

ही बसून केली जाणारी सेक्स पोजिशन आपल्या जोडीदाराच्या शरीराला पूर्णपणे ब्लॉक करते. त्यामुळे तुम्हाला सेक्स करताना हलावेसुद्धा लागत नाही. Anal Sex पहिल्यांदा करत असाल तर घ्या या '5' गोष्टींची काळजी

5. साउंडप्रूफिंग हॅक (Soundproofing Hack)

जर तुम्ही एकत्र कुटूंबात राहत असाल तर तुम्ही तुमच्या खोलीला साउंडप्रूफ बनवू शकता. सेक्स करताना तुमचा आवाज खोलीच्या बाहेर जाऊ नये म्हणून तुम्ही खोलीच्या दरवाजावर थर्माकोल लावू शकता. तसेच तुम्ही तुमच्या भिंतींवरही थर्माकोल लावू शकता.

6. संगीत (Music)

सर्वात सोपा उपाय म्हणजे सेक्स करताना तुमच्या खोलीत एखादे गाणे लावून ठेवा जेणेकरुन तुमचा आवाज बाहेर जाणार नाही आणि सुंदर रोमँटिक गाण्यांमुळे तुमचा सेक्स करताना मूड सुद्धा चांगला राहील.

7. वेळ (Timing)

घरात खूप आवाज थोडक्यात बडबड आणि गर्दी असेल तर तुम्ही तुमच्या सेक्स करण्याच्या वेळेत बदल करावा. सकाळी लवकर आणि रात्री उशिरा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सेक्स करु शकता जेव्हा घरातील लोक झोपलेले असतील.

8. ठिकाण (Place)

जर तुम्हाला तुमच्या घरात सेक्स करता येत नसेल तर तुम्ही बाथरूममध्ये किंवा शॉवर खाली जाऊन सेक्सची मजा घेऊ शकता. तसेच जर तुमच्या घरात अडगळीची खोली असेल तर तुम्ही तेथेही सेक्स करु शकता.

हे तर झालं तुमच्या माहितीसाठी पण या सर्व गोष्टी करण्याआधी तुमच्या जोडीदाराशी या विषयी चर्चा करा. त्याचे याविषयी काय मत आहे हे विचारात घ्या. आणि दोघांच्या सहमतीने तुमची सेक्स लाईफ एन्जॉय करा.

(सूचना : वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही)