Isha Ambani-Anand Piramal यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनला सुरुवात; अंबानींकडून 5100 लोकांसाठी अन्नसेवा
ईशा अंबानी-आनंद पिरामल यांचे प्री वेडिंग सेलिब्रेशन उदयपूर येथे सुरु झाले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कन्या ईशा अंबानी (Isha Ambani) हिचा उद्योगपती अजय पिरामल (Ajay Piramal) यांचा मुलगा आनंद पिरामल (Anand Piramal) सोबत विवाह होणार आहे. त्यापूर्वी ईशा-आनंदच्या विवाहपूर्व सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. प्री वेडिंग सेलिब्रेशनसाठी दोन्ही कुटुंबिय उदयपूर (Udaipur) येथे दाखल झाले आहेत. हे प्री वेडींग सेलिब्रेशन खास पद्धतीने करण्यात येणार आहे. या सेलिब्रेशनअंतर्गत चार दिवसांसाठी अन्नसेवा सुरु करण्यात आली आहे. या सेवेअंतर्गत 5100 लोकांना तीन वेळेचे अन्न पुरवले जाणार आहे. यात अधिकतर अपंग लोकांचा समावेश आहे. ही अन्नसेवा 7 ते 10 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या दरम्यान त्यांना तीन वेळेचे अन्न पुरवण्यात येईल. हे ही वाचा: कोण कोण असेल ईशाच्या सासरच्या घरी?
अंबानी इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) तर प्रसिद्ध उद्योगपती अजय पीरामल आणि पत्नी स्वाती पिरामल (Swati Piramal) ईशा-आनंदसह उदयपूर येथे दाखल झाले आहेत. अन्नसेवेत यांनी स्वतः सहभाग घेतला आहे. त्यांनी स्वतः लोकांना अन्न वाढलं. त्यांच्याशी गप्पाही मारल्या. विशेष म्हणजे या उत्सवादरम्यान 'स्वदेश बाजार' प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. यात देशभरातील निवडक अशा 108 पारंपारिक कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित केले आहे. ईशा अंबानीच्या विवाहसोहळ्यात देसी गर्ल प्रियंका चोप्रा लावणार ठुमके !
12 डिसेंबरला ईशा आणि आनंद हिंदू परंपरेनुसार मुंबईतील अंबानी हाऊसमध्ये विवाहबद्ध होतील.