Winter Health Tips: थंडीत रोज चेह-यावर गरम पाण्याची वाफ घेतल्याने काय होतात फायदे? जाणून घ्या वाफ घेण्याची योग्य पद्धत

चेह-यावर गरम पाण्याची वाफ घेतल्याने त्वचेला देखील आराम मिळतो. असे अनेक फायदे गरम पाण्याची वाफ घेतल्याने होतात.

Hot Water Steam on face (Photo Credits: YouTube)

हिवाळा (Winter) आणि पावसाळा या दोन ऋतूत वातावरणात गारवा आल्याने सर्दी, खोकला, कफ (Cough) यांसारखे आजार होण्याचे प्रमाण अधिक असते. अशा वेळी बरीच लोक गरम पाणी पिणे, हळदीचे दूध पिणे यांसारखे उपाय करतात. यासोबत चेह-यावर गरम पाण्याची वाफ (Hot Water Steam) घेण्याचे प्रकारही अनेकदा पाहायला मिळतात. कारण गरम वाफेच्या न केवळ चेह-याला तर शरीराला देखील अनेक फायदे होतात. हिवाळ्यात अनेक आजारांपासून आपला बचाव करतात. चेह-यावर गरम पाण्याची वाफ घेतल्याने त्वचेला देखील आराम मिळतो. असे अनेक फायदे गरम पाण्याची वाफ घेतल्याने होतात.

गरम पाण्याची वाफ घेण्याची योग्य पद्धत

तुमच्याकडे वाफ घेण्याची मशीन नसेल तर एका भांड्यात 3 किंवा 4 ग्लास पाणी टाकून झाकून ठेवा. हे 5-8 मिनिटे गरम होऊ द्या. यानंतर डोक्यावर एक कॉटनचा टॉवेल घ्या आणि भांड्यावरील झाकन काढून 5 ते 10 मिनिटे वाफ घ्या. आठवड्यातून 3-4 वेळा असे करता येऊ शकते.हेदेखील वाचा- Benefits of Drinking Hot Water: जाणून घ्या गरम पाणी पिण्याचे फायदे, वाचून तुम्ही ही रोज गरम पाणी पिण्यास सुरुवात कराल

गरम पाण्याची वाफ घेण्याचे फायदे:

1. हिवाळ्यात चेह-यावर गरम पाण्याची वाफ घेतल्यास सर्दी, खोकला या सारख्या आजारांपासून आराम मिळतो.

2. हिवाळ्यात कोरडी झालेली त्वचा मऊ होते. चेह-यावरील त्वचेवर चकाकी येते.

3. हिवाळ्यात चेह-यावर आलेले डेड सेल्स नाहीसे होतात आणि चेह-यावरील त्वचा मोकळी होते.

4. रोज वा आठवड्यातून 2-3 दिवस चेह-यावर गरम पाण्याची वाफ घेतल्यास त्वचेची घाण दूर होते. पिंपल्स प्रॉब्लेम नियंत्रणात राहण्यास मदत होते.

5. नियमित गरम वाफ घेतल्यास श्वसनाचा त्रास कमी होतो. नाक चोंदले असल्यास गरम वाफ नाकात जाऊन नाक मोकळे होते आणि श्वासोच्छवास सुरळीत सुरु राहते.

6. धुळ, प्रदूषणावर चेह-यावर चिकटलेली घाण स्वच्छ होते आणि चेह-याला ग्लो येतो.

थोडक्यात थंडीत चेह-यावर गरम पाण्याची वाफ घेतल्यास न केवळ चेह-यावर चांगले परिणाम दिसून येतात तर आरोग्यावर चांगले परिणाम होतात. त्यामुळे जमेल तसे दिवसातून एकदा का ना होईना पण हिवाळ्यात गरम पाण्याची वाफ अवश्य घ्यावी.

(टीप- या लेखात दिलेल्या सर्व माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आम्ही याचा दावा करीत नाही की, लेखात दिलेली माहिती तुमच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा)