Weight Loss Tips: रोज सकाळी रिकाम्यापोटी प्या गरम लिंबू पाणी आणि महिन्याभरात आणा तुमच्या वाढणा-या वजनावर नियंत्रण
त्याला तसेच कारण आहे.
लॉकडाऊन (Lockdown) आणि कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) फिटनेस फ्रिक असणा-या चांगलेच वांदे झाले आहेत. जिम, उद्याने हळूहळू सुरु होत असली तरी कोरोनाची भीती मागे आहेच. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून रोजचे वर्कआऊट (Workout) कसे करायचे असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला आहे. त्यात लॉकडाऊन गेल्या 8 महिने वर्क फ्रॉम होम करुन देखील अनेकांनी लठ्ठपणाला सामोरे जावे लागत आहे. रोजचा व्यायाम आणि चालणे न होत असल्यामुळे वजन वाढण्याच्या समस्येचा अनेकांना सामना करावा लागत आहे. त्यात घरातही कमी जागेमुळे वा कुटूंबामुळे नीटसे वर्कआऊट करता येत नसल्याने वजन वाढीची (Weight Gain) समस्या उद्भवली आहे. अशा परिस्थितीत काय करावे हा मोठा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला आहे. तर समस्येचे निराकरण आहे लिंबू-पाणी (Lime Water)
होय. तुम्ही बरोबर ऐकलात रोज सकाळी रिकाम्यापोटी गरम लिंबू पाणी (Hot Lemon Water) प्यायल्याने तुम्ही महिन्याभरात तुमच्या वाढणा-या वजनावर नियंत्रण आणू शकता. अनेकांना प्रश्न पडला असेल वर्कआऊट न करता केवळ गरम लिंबू-पाणी प्यायल्याने वजन कसे नियंत्रित येऊ शकते. त्याला तसेच कारण आहे. लिंबूमध्ये थियामिन, रिबोफ्लोविन, नियासिन, व्हिटामिन बी-6, फोलेट आणि व्हिटामिन- ई असते. यामुळे लिंबू पाणी प्यायल्यास शरीरातील मेटाबॉलिजम वाढते. ज्याने वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी मदत होते. पण शक्य असल्यास यासोबत रोज थोडा वेळ चालणे गरजेचे आहे.
हेदेखील वाचा- Summer Health Tips: उन्हाळ्यात लिंबू सरबत प्यायलाने शरीरास होणारे 'हे' आश्चर्यजनक फायदे तुम्हाला माहित आहे का?
कशा पद्धतीने प्याल लिंबू-पाणी
रोज सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस पिळून ते चांगलं चमच्याने ढवळा. त्यानंतर लगेचच हे पाणी प्या.
असे सलग महिनाभर केल्यास तुम्हाला थोड्याफार प्रमाणात फरक जाणवेल. लिंबू पाणी बायोफ्लेवोनॉयड, व्हिटामिन सी आणि फायटोन्यूट्रियंट्सचं चांगलं स्त्रोत आहे त्यासोबतच शरीरातील इम्युनिटी म्हणजेच रोग प्रतिकारशक्ती देखील वाढवतं. वैद्यकिय सर्वेमध्येही असे स्पष्ट झाले आहे की जे लोक नियमित लिंबूपाणी पितात त्यांचे वजन इतरांच्या तुलनेत लवकर घटते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन हा उपाय महिनाभर तरी करुन पाहा.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)