Heart Attack Symptom: हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी दिसतात 'ही' लक्षणं; हे उपाय केल्यास वाचू शकतो जीव, वाचा सविस्तर
हृदयाच्या शिरा ब्लॉक झाल्यामुळे तुम्हाला छातीत जडपणा येऊ शकतो. थोडासा प्रयत्न केल्यावरही तुम्हाला श्वास लागणे किंवा छातीत दुखणे, गुदमरणे आणि अस्वस्थता जाणवणे, ही हृदयविकाराची लक्षणे असू शकतात.
Heart Attack Symptom: देशभरात हृदयविकाराच्या झटक्यांमध्ये (Heart Attack) सातत्याने वाढ होत आहे. गेल्या काही काळापासून अनेक सेलिब्रिटींना एकापाठोपाठ एक हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्या येत आहेत, ज्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हृदयविकार आणि त्यामुळे मृत्यूच्या घटनांनी सर्वांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. सर्वात भयावह बाब म्हणजे हृदयविकाराच्या अनेक घटनांमध्ये जीव गमावलेले लोक तरुण आणि पूर्णपणे निरोगी होते. हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी, आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये काही मोठा अडथळा आहे की नाही हे जाणून घेणे सर्वात महत्वाचे आहे.
कोरोनरी धमन्या या तुमच्या शरीरातील प्रमुख रक्तवाहिन्या आहेत, ज्या तुमच्या हृदयाला रक्तपुरवठा करतात. जर त्यांच्यात काही गडबड असेल किंवा कोणत्याही कारणास्तव ब्लॉकेज असेल तर हा मोठा धोका आहे. (हेही वाचा - Roti Made on Gas Can Cause Cancer: शेगडी, गॅस स्टोव्हवर चपाती शेकणं ठरू शकतं कर्करोग, हृदयविकाराला आमंत्रण; अभ्यासात झाला धक्कादायक खुलासा)
हृदयाच्या शिरा ब्लॉक झाल्यामुळे तुम्हाला छातीत जडपणा येऊ शकतो. थोडासा प्रयत्न केल्यावरही तुम्हाला श्वास लागणे किंवा छातीत दुखणे, गुदमरणे आणि अस्वस्थता जाणवणे, ही हृदयविकाराची लक्षणे असू शकतात. थकवा, धाप लागणे, हृदयाचे ठोके अचानक वेगवान होणे, ही देखील हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे आहेत. याशिवाय हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये छातीत दुखणे किंवा दाब येणे हे हृदयविकाराचे लक्षण असू शकते.
हृदयविकाराची लक्षणे आढळल्यास काय करावे?
जर एखाद्या रुग्णाला ही लक्षणे जाणवत असतील तर त्याने ताबडतोब हृदयरोगतज्ज्ञांकडे जावे. विशेषत: उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या आजारांचा कौटुंबिक इतिहास असल्यास, तुम्ही तुमच्या हृदयाची संपूर्ण तपासणी करून घ्या.
हृदयविकाराचा झटका आल्यास काय करावे?
हृदयविकाराच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये छातीत तीव्र वेदना, जडपणा, जबडा, पाठ किंवा डाव्या हाताला मुंग्या येणे, घाम येणे आणि अस्वस्थता यांचा समावेश होतो. असे झाल्यास, तुम्ही ताबडतोब मदतीसाठी आपत्कालीन वैद्यकीय हेल्प लाइन नंबरवर कॉल करा. वैद्यकीय मदत येईपर्यंत तुम्ही रुग्णाला एस्पिरिनची गोळी खायला देऊ शकता.
दरम्यान, 70 टक्क्यांपेक्षा कमी ब्लॉकेज असलेल्या रुग्णांवर औषधोपचार केले जातात. 75 टक्क्यांहून अधिक लक्षणे असलेल्या रुग्णांवर अँजिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रिया करून उपचार केले जातात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)