Sanitary Pads: सावध व्हा! सॅनिटरी पॅड ठरू शकतात घातक; आढळली कर्करोग, वंध्यत्वाला कारणीभूत ठरणारी रसायने- Study

सॅनिटरी पॅडबाबाब्त युरोपीय देशांमध्ये कडक नियम आहेत, परंतु सॅनिटरी पॅडची रचना, निर्मिती आणि वापर याबाबत भारतात कठोर मानक नाहीत. जरी हे BIS मानकांच्या अधीन असले तरी, रसायनांवर कोणतेही विशिष्ट प्रिस्क्रिप्शन नाही.

सॅनिटरी पॅड्स ( फोटो सौजन्य- फेसबुक )

मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्‍या सॅनिटरी नॅपकिन्सबाबत (Sanitary Pads) एका अभ्यासात महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. भारतात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या सॅनिटरी पॅडमध्ये कर्करोगाला (Cancer) कारणीभूत ठरणारी रसायने आढळून आली आहेत, असे एका नवीन अभ्यासात दिसून आले आहे. भारतातील चारपैकी जवळपास तीन किशोरवयीन महिला सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात, त्यामुळे ही धक्कादायक चिंताजनक वस्तुस्थिती आहे.

डॉ अमित, पर्यावरण एनजीओ टॉक्सिक्स लिंकचे कार्यक्रम समन्वयक आणि एक अन्वेषक म्हणाले की, सामान्यतः उपलब्ध असलेल्या सॅनिटरी उत्पादनांमध्ये इतकी हानिकारक रसायने सापडणे धक्कादायक आहे. यामध्ये कार्सिनोजेन, रिप्रोडक्टिव्ह टॉक्सिन्स, एंडोक्राइन डिसरप्टर्स आणि ऍलर्जीन सारख्या विषारी रसायनांचा समावेश आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनजीओने केलेल्या अभ्यासात भारतभरात उपलब्ध असलेल्या 10 ब्रँडच्या पॅड्सची (सेंद्रिय आणि अजैविकसह) चाचणी केली गेली आणि सर्व नमुन्यांमध्ये Phthalates आणि Volatile Organic Compounds (VOCs) आढळून आले. दोन्ही प्रदूषक रसायनांमध्ये कर्करोगाच्या पेशी निर्माण करण्याची क्षमता असते. ToxicsLink ला असे आढळून आले की, विश्लेषित केलेल्या काही पॅडमध्ये त्यांची एकाग्रता युरोपियन नियमन मानकांपेक्षा तीनपट जास्त आहे.

या प्रकरणात सर्वात चिंतेची बाब म्हणजे सॅनिटरी पॅड्सद्वारे हानिकारक रसायने शरीराद्वारे शोषली जाण्याची शक्यता खूप जास्त आहे. डॉ आकांक्षा मेहरोत्रा, म्हणाले की योनी, श्लेष्मल त्वचा म्हणून, शरीरावरील इतर त्वचेपेक्षा जास्त रसायने स्राव आणि शोषू शकते. यामुळे महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. (हेही वाचा: 'भरपूर मीठ असलेल्या आहारामुळे तणावाची पातळी वाढू शकते'- Study)

सॅनिटरी पॅडबाबाब्त युरोपीय देशांमध्ये कडक नियम आहेत, परंतु सॅनिटरी पॅडची रचना, निर्मिती आणि वापर याबाबत भारतात कठोर मानक नाहीत. जरी हे BIS मानकांच्या अधीन असले तरी, रसायनांवर कोणतेही विशिष्ट प्रिस्क्रिप्शन नाही. दरम्यान, ताज्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की 15-24 वयोगटातील सुमारे 64 टक्के महिला सॅनिटरी पॅड वापरतात. असा अंदाज आहे की अधिक श्रीमंत सोसायट्यांमध्ये पॅडचा वापर जास्त आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement