Diabetes Symptoms: चालताना 'ही' 4 लक्षणे दिसली तर समजा तुम्हाला मधुमेह झाला! कोणती आहेत ही लक्षणं? जाणून घ्या
मधुमेह शरीरावर हळूहळू परिणाम करतो आणि सुरुवातीच्या काळात त्याची लक्षणे खूपच सौम्य असतात. तथापि, काही लक्षणे अशी आहेत जी शारीरिक हालचालींदरम्यान स्पष्टपणे दिसून येतात.
Diabetes Symptoms: मधुमेह (Diabetes) ही शरीरातील इन्सुलिन संप्रेरकाच्या (Insulin Hormone) असंतुलनामुळे होणारी एक गंभीर आरोग्य समस्या आहे. हा एक आयुष्यभराचा आजार आहे ज्यावर कोणताही इलाज नाही. हा आजार असा आहे जो, नियंत्रित करता येतो, पण तो बरा करता येत नाही. मधुमेह शरीरावर हळूहळू परिणाम करतो आणि सुरुवातीच्या काळात त्याची लक्षणे खूपच सौम्य असतात. तथापि, काही लक्षणे अशी आहेत जी शारीरिक हालचालींदरम्यान स्पष्टपणे दिसून येतात, जसे की चालणे. आज आपण अशा 4 मधुमेहाच्या लक्षणाबद्दल जाणून घेऊयात, जे चालताना दिसू शकतात.
चालताना जाणवणारी मधुमेहाची लक्षणे -
थकवा आणि अशक्तपणा जाणवणे -
मधुमेही रुग्णांमध्ये थकवा आणि अशक्तपणा ही सामान्य लक्षणे आहेत. जेव्हा रक्तातील साखरेची पातळी जास्त असते तेव्हा शरीराच्या पेशी उर्जेसाठी ग्लुकोजचा योग्य वापर करू शकत नाहीत. यामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही आणि व्यक्तीला थकवा जाणवतो. चालताना हा थकवा आणखी वाढतो, कारण शारीरिक हालचाली करताना जास्त ऊर्जा लागते. थोडे अंतर चालल्यानंतर जर तुम्हाला थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर हे मधुमेहाचे लक्षण असू शकते. (हेही वाचा -Man Gets Fungal Infection After Drinking Coconut Water: नारळपाण्याने घेतला जीव! बुरशीजन्य संसर्गामुळे मेंदूला नुकसान; 69 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू)
पाय दुखणे किंवा सुन्न होणे -
मधुमेहामुळे मज्जातंतूंचे नुकसान होऊ शकते, ज्याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात. या स्थितीत, तुम्हाला तुमच्या पायांमध्ये वेदना, मुंग्या येणे किंवा सुन्नपणा जाणवू शकतो. चालताना पायांवर दबाव असल्याने ही समस्या अधिक तीव्र होते. चालताना जर तुम्हाला पायांमध्ये असामान्य वेदना किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर ते मधुमेहाचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
दम लागणे -
मधुमेहाच्या रुग्णांमध्ये श्वास घेण्यास त्रास होण्याची समस्या अनेकदा दिसून येते. जेव्हा एखादी व्यक्ती चालते किंवा कोणतीही शारीरिक हालचाल करते तेव्हा ही समस्या आणखी वाढते. मधुमेहामुळे हृदय आणि फुफ्फुसांवर अतिरिक्त दबाव येतो म्हणून असे घडते. यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. थोडे अंतर चालल्यानंतर जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हे मधुमेहाचे लक्षण असू शकते.
पायांना सूज येणे -
मधुमेहामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे पायांना सूज येते. चालताना ही सूज अधिक लक्षात येऊ शकते, कारण पायांवर दाब असतो. तसेच, मधुमेहामुळे मूत्रपिंडाच्या कार्यावरही परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे शरीरात द्रव जमा होऊ लागतो आणि सूज येण्याची समस्या वाढते. जर तुमचे पाय कोणत्याही दुखापतीशिवाय सुजत असतील तर ते मधुमेहाचे लक्षण असू शकते. (हेही वाचा - Summer Fatigue Symptoms & Tips to Manage: उन्हाळ्यातील थकवा ठरू शकतो धोकादायक; जाणून घ्या लक्षणे व कशी कराल मात)
जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे दिसली तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळेत हा आजार ओळखून योग्य उपचार घेतल्यास गंभीर समस्या टाळता येतात. निरोगी जीवनशैली, योग्य आहार आणि नियमित व्यायाम मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
Disclaimer: लेखात नमूद केलेले सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावू नये. तुम्हाला काही प्रश्न किंवा समस्या असल्यास नेहमीच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)