IPL Auction 2025 Live

COVID-19 RT PCR Test Report कसा वाचायचा, CT Value नेमकं कोविड 19 इंफेक्शन बद्दल काय सांगत?

सध्याच्या आयसीएमआर गाईडलाईन्स नुसार, ज्यांची सीटी व्हॅल्यू 35 पेक्षा कमी आहे त्यांना कोविड पॉझिटिव्ह मानलं जावं आणि 35 च्या पार सीटी व्हॅल्यू असेल तर ते कोविड निगेटीव्ह मानले जावेत.

COVID 19 Test | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

जगभरात सध्या कोविड 19 ची दहशत असल्याने आता अनेक सामान्य नागरिकांना देखील आरोग्याशी आणि आजारपणाशी निगडीत वैज्ञानिक संज्ञा परिचयाच्या झाल्या आहेत. अशांपैकी एक म्हणजे ‘CT Value’. कोवीड 19 चा आरटी पीसीआर टेस्ट रिपोर्ट (RT PCR Test Report) पाहिला की अनेकजण त्यामध्ये सीटी व्हॅल्यू पहिल्यांदा बघतात. हा पाहून रूग्ण कोविड पॉझिटीव्ह (Covid Positive) आहे की निगेटीव्ह (Covid Negative) याची कल्पना येते.

सीटी व्हॅल्यू वरून देखील उपचार ठरवले जातात. काही दिवसांपूर्वीच जर रूग्ण कोविड निगेटीव्ह असे पण त्याची सीटी व्हॅल्यू 24 पेक्षा जास्त असेल तो asymptomatic असेल तर त्याच्यावर उपचार करायचे का? या महाराष्ट्र सरकारच्या प्रश्नावर ICMR ने उत्तर दिले आहे. सध्याच्या आयसीएमआर गाईडलाईन्स नुसार, ज्यांची सीटी व्हॅल्यू 35 पेक्षा कमी आहे त्यांना कोविड पॉझिटिव्ह मानलं जावं आणि 35 च्या पार सीटी व्हॅल्यू असेल तर ते कोविड निगेटीव्ह मानले जावेत. नक्की वाचा: ICMR कडून Dry Swab RT-PCR COVID-19 Test ला परवानगी; आता कोविड टेस्टिंग होणार वेगवान.

टेस्ट रिपोर्ट मध्ये CT value काय सांगतो?

CT value म्हणजे किती सायकल नंतर कोरोना वायरसचं निदान झालं आहे. हा जितका कमी असेल तितकी शरीरात वायरस लेव्हल अधिक असते. जितकी सिटी व्हॅल्यू जास्त तितकी शरीरात वायरसची संख्या कमी. आरटी पीसीआर टेस्ट मध्ये सीटी व्हॅल्यू हा महत्त्वाचा घटक आहे.

आरटी पीसीआर टेस्ट केल्यानंतर जमा केलेल्या स्वॅब मधून RNA extraction केले जातं. नंतर या RNA चे DNA मध्ये रूपांतर करतात मग ते वाढवलं जातं. यामध्ये जेनेटिक मटेरिअलच्या एकापेक्षा अधिक कॉपीज बनवल्या जातात.

CT value का महत्त्वाची आहे?

ICMR रिपोर्ट्सनुसार, जर रूग्णाची सीटी व्हॅल्यू 35 पेक्षा कमी आहे म्हणजे तो कोविड पॉझिटीव्ह आहे. 25-34 दरम्यानची व्हॅल्यू देखील कोविड पॉझिटीव्ह म्हणून मानली जात नाही. कमी सीटी अप्रोच म्हणजे काही इंफेक्शन सुटून गेल्याचं संकेत देतात. त्यामुळे ही व्हॅल्यू ही संक्रमणाची देखील माहिती देते. पण सीटी व्हॅल्यू 24 पेक्षा कमी असेल म्हणजे इंफेक्शन जास्त असल्याचं समजतं.

संसर्गाच्या धोक्याची माहिती मिळते का?

सीटी व्हॅल्यू वर शरीरातील वायरल लोड यचा थेट संबंध असला तरीही कमी सीटी व्हॅल्यू म्हणजे प्रत्येकच वेळेस त्याचा धोका जास्त असेदेखील नाही. शरीरात वायरल लोड जास्त असलेले देखील रूग्ण Asymptomatic असतात. याबाबतचा एक अहवाल Indian Journal of Medical Microbiology मध्ये जानेवारीत प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार, सीटी व्हॅल्यूवर आजाराची तीव्रता किंवा रूग्ण दगावण्याचा धोका अवलंबून नाही. यामध्ये सीटी व्हॅल्यू सोबत रूग्णांची लक्षणं अधिक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यावरून धोका किती याचा अंदाज लावता येईल.

आजकाल कोविड 19 चे निदान करण्यासाठी आरटीपीसीआर सोबत इतरही अन्य अनेक टेस्ट  उपलब्ध आहेत पण सर्वात विश्वसनीय म्हणून आरटीपीसीआर टेस्टचं सध्या ग्राह्य धरली जाते.

India Times सोबत बोलताना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डॉ.  Parikshit Prayag यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणतात,'सीटी व्हॅल्यू तुमच्या घशातील  वायरल लोड सांगतो फुफ्फुसातील नव्हे. आमच्यासाठी तो infectivity point ने केवळ महत्त्वाचा असतो.