Plasma Donation: कोरोनावर मात केल्यानंतर किती दिवसानंतर प्लाझ्मा दान करू शकतात? त्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? जाणून घ्या सविस्तर

आयजीजी चाचणी जवळपासच्या कोणत्याही लॅबमध्ये करता येते.

Plasma Donation | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Plasma Donation: भारतात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. दररोज लाखो नागरिक कोरोना विषाणूच्या संक्रमणाचे बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांची मदत एखाद्याचा जीव वाचवू शकते. कोरोना रुग्णांना प्लाझ्मा दान करून तुम्ही त्याची मदत करू शकता. सध्या प्लाझ्मा दान एखाद्यासाठी वरदान ठरू शकते. सामाजिक कार्यकर्त्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटीपर्यंत सर्व दिग्गज व्यक्ती प्लाझ्मा दानाचे महत्त्व पटवून देत आहेत. म्हणून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, शक्य असल्यास प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन सरकारतर्फे वारंवार करण्यात येत आहे. (वाचा - कोविड-19 ची लस घेतल्यानंतर प्लाझ्मा दान करता येईल? Plasma Donation पूर्वी जाणून घ्या 'या' महत्त्वपूर्ण बाबी)

प्लाझ्मा दान कोण करू शकतो?

प्लाझ्मा देण्यापूर्वी आयजीजी चाचणी का आवश्यक आहे?

प्लाझ्मा दान करण्यापूर्वी त्यात आयजीजी चाचणीची भूमिका काय आणि त्यात काय महत्त्वाचे आहे? हे नक्की जाणून घ्या. आयजीजी चाचणी जवळपासच्या कोणत्याही लॅबमध्ये करता येते. कारण त्याशिवाय प्लाझ्मा दान केले जाऊ शकत नाही. या अहवालात शरीरातील एंटीबॉडीज दिसून येतात. जेव्हा एंटीबॉडीजची योग्य मात्रा तयार केली जाते तेव्हाचं प्लाझ्मा दान केले जाऊ शकते.

हिमोग्लोबिन 12 पेक्षा जास्त असावे

प्लाझ्मा डोनेशन करण्यापूर्वी विविध खबरदारी घेणे आवश्यक आहे. यासाठी, शरीरातील हिमोग्लोबिनची टक्केवारी प्रति डेसीलीटर 12.50 ग्रॅमपेक्षा कमी नसावी. हे प्रमाण यापेक्षा कमी असल्यास प्लाझ्मा दान केले जाऊ शकत नाही.