How to Increase Immunity? सामान्य जीवनशैली जगताना रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी?

लोक आहारतज्ज्ञांकडे जावू लागले. काय खावे, काय खाऊ नये. व्यायाम किती आणि कसा करावा? यााबत अचानक जागृकता वाढीस लागली. पण, तुम्हाला माहिती आहे का? अगदी सामान्य आयुष्य जगत तुम्ही सदृढ आणि निरोगी राहू शकता. तुमची रोगप्रतिकारक शक्ती (Immune System) वढवू शकता. होय, हे शक्य आहे.

Immunity | Representational Image (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीच्या काळात लोकांना निरोगी आणि सदृढ आरोग्याचे महत्त्व बरेच पटले. लोक आहारतज्ज्ञांकडे जावू लागले. काय खावे, काय खाऊ नये. व्यायाम किती आणि कसा करावा? यााबत अचानक जागृकता वाढीस लागली. पण, तुम्हाला माहिती आहे का? अगदी सामान्य आयुष्य जगत तुम्ही सदृढ आणि निरोगी राहू शकता. तुमची रोगप्रतिकारक शक्ती (Immune System) वढवू शकता. होय, हे शक्य आहे. रोगप्रतिकार शक्ती म्हणजे संसर्ग आणि रोगांशी लढण्यासाठी शरीराची ताकद. पण लक्षात घेणे महत्वाचे आहे की अशी कोणतीही जादूची कांडी नाही जी प्रतिकारशक्ती त्वरित सुधारू शकते. त्यासाठी आपणास काही प्रयत्न आणि जीवनशैलीतील बदल करावे लागतील. ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत होऊ शकते. म्हणूनच जाणून घ्या जाणून घ्या अशा कोणत्या गोष्टी आहेत. ज्या आपणास फायेशीर ठरु शकतील.

निरोगी आहार घ्या: प्रतिकारशक्ती चांगली राखण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आहारात विविध फळे, भाज्या, पातळ प्रथिने, संपूर्ण धान्य आणि निरोगी चरबी यांचा समावेश असावा.

नियमितपणे व्यायाम करा: व्यायामामुळे शरीराच्या नैसर्गिक संरक्षणास चालना मिळते. नियमित शारीरिक हालचालींसह रक्त प्रवाह वाढवून, रक्ताभिसरण सुधारून आणि तणाव कमी करून रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवण्यास मदत करते.

पुरेशी झोप घ्या: शरीराला रिचार्ज करण्यासाठी आणि स्वतःची दुरुस्ती करण्यासाठी झोप आवश्यक आहे. झोपेच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि संसर्गाचा धोका वाढतो. (हेही वाचा, India Developed Herd Immunity: भारतात अपयशी ठरेल कोरोनाची लाट; इथल्या लोकांमध्ये तयार झाली आहे हर्ड इम्युनिटी, जाणून घ्या एम्सच्या डॉक्टरांचे मत)

तणाव व्यवस्थापनकरा: तणावामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते आणि आजाराचा धोका वाढू शकतो. दीर्घ श्वास घेणे, योगासने किंवा ध्यान करणे यासारखे तणावाचे व्यवस्थापन करण्याचे मार्ग शोधणे महत्त्वाचे आहे.

तंबाखू आणि अल्कोहोल टाळा: धूम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे टाळा. धूर्मपाणामुळे आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्यास मोठी हानी पोहोचते. वरवर पाहता शरीराचे झालेले नुकसान दिसत नाही. पण, जसजसे वय वाढू लागते. तसतसे शरीर विविध समस्यांना निमंत्रण देते.

महत्त्वाचे म्हणजे जग कोरोनाव्हायरसारख्या जगभर पसरलेल्या साथीच्या आजाराशी लढा देत असताना, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची गरज अधिक महत्त्व प्राप्त झाली आहे. रोगप्रतिकार शक्ती म्हणजे संसर्ग आणि रोगांशी लढण्यासाठी शरीराची ताकद. जी तुम्हाला विविध आजारांपासून नैसर्गिकरित्या दूर ठेवते.