Hair Loss Symptoms and Causes: केस गळती, टक्कल पडणे; लक्षणे, कारणे आणि वैद्यकीय मदत केव्हा घ्यावी? घ्या जाणून
Hair Loss: केस गळतीची सामान्य लक्षणे आणि मूलभूत कारणे काय आहेत? केस गळती आणि टक्कल पडणे याबाबतची विविध लक्षणे, प्रकार यांबाबत माहिती हवी? महिला आणि पुरुषांनी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला कधी घ्यावा? याबाबत घ्या अधिक जाणून
डोक्यावरचे केस गळणे (Hair Loss) ही खरेतर एक सर्वसामान्य बाब आहे. जगभरातील प्रत्येक व्यक्तीचे केस गळत (Hair Loss Causes) असतात. त्याबाबत फार चिंता करु नये. पण, चिंता तेव्हा करणे आवश्यक असते, जेव्हा तुमचे केस प्रमाणापेक्षा अधिक गळू लागतात. ज्यामुळे तुम्हाला टक्कल पडण्याची भीतीही सतावू लागते. केस गळण्याची कारणे आणि लक्षणे (Hair Loss Symptoms) अनेकदा तुमची जीवनशैली, आहार, वैद्यकीय उपचार, केसांसाठी वापरलेली केमीकलयुक्त विविध सौंदर्यप्रसाधने आणि भोगौलिक प्रदेश, प्रथा परंपरा यांवरही अवलंबून असतात. अनेक प्रकरणांमध्ये मात्र यातील काहीच कारणे नसतानाही केसगळती होते आणि टक्कल पडतो किंवा तशी लक्षणे दिसू लागतात. अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही महत्त्वाचे ठरते. म्हणूनच जाणून घ्या केस गळती, टक्कल पडणे; लक्षणे, कारणे आणि वैद्यकीय मदत केव्हा घ्यावी?
आजार आणि केस गळती यांचा संबंध
हळूहळू पातळ होणे: अपवाद वगळता जन्मत:च मानवाच्या डोक्यावर घनदाट केस उगवतात. पुढे बालपण आणि तारुण्यात ते अधिक लांब, जाड आणि काळेभोर होतात. पण, अचानक असे काहीतरी सुरु होते आणि केस हळूहळू गळू लागतात. ज्यामुळे डोक्यावरचे केसांचे जाळे विरळ होऊन ते पातळ होत जाते. हा केस गळण्याचा सर्वात सामान्य प्रकार आहे, ज्याचे वैशिष्ट्य म्हणजे टाळूवरील केसांची घनता हळूहळू कमी होते. (हेही वाचा, Hair Loss Outbreak in Maharashtra: भयानक केसगळती, अनेकांना टक्कल, नागरिक हैराण; महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये विचित्र आजार)
वर्तुळाकार किंवा छोटे टक्कल झालेले ठिपकेः डोक्यावर घनदाट केस असले तरी, काही लोकांमध्ये अचानक किंवा हळूहळू एकाच जागेवरचे केस गळून तिथे छोटे छोटे टक्कल असलेले टीपके दिसू लागतात. काही वेळा एकच मोठा वर्तुळाकार टीपकाही टक्कल असल्यासारखा दिसतो. ही कदाचित एलोपेसिया एरियटा आजाराची लक्षणे आणि लागण असू शकते. ज्यामध्ये टाळूवर गोल ठिपक्यांमध्ये केस गळतात आणि कधीकधी दाढी किंवा भुवयांसारख्या शरीराच्या इतर भागांवर परिणाम होऊ शकतो.
अचानक केस गळणेः या प्रकाराला टेलोजेन एफ्लुवियम असेही म्हणतात. ही एक अशी स्थिती आहे जेथे तणावपूर्ण घटना, शस्त्रक्रिया किंवा आजारपणानंतर काही आठवडे किंवा महिन्यांत लक्षणीय केस गळणे होते. (हेही वाचा, Hair Lss Reversing Medicine: टक्कल आणि केस गळतीवर 20 रुपयांमध्ये रामबाण औषध? यूपीच्या मेरठमध्ये दोन तरुणांचा दावा, तेल घेण्यासाठी जमली तोबा गर्दी (Video))
संपूर्ण शरीरावरील केस गळणेः ही एक दुर्मिळ स्थिती आहे. ज्याला अलोपेसिया युनिव्हर्सलिस असेही म्हणतात. ज्यामुळे टाळू, भुवया, पापण्या आणि शरीराचे केस यासह संपूर्ण शरीरावरील केस पूर्णपणे गळतात.
केस गळती होण्याची सामान्य कारणे
अनुवांशिकता: अनेक स्त्री आणि पुरुषांमध्ये केस गळण्याचे, टक्कल पडण्याचे सामान्य कारण पाहायला मिळते ते म्हणजे अनुवांशिकता. ज्याला एंड्रोजेनेटिक एलोपेसिया (AGA) असेही म्हणतात. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केस गळून अकाली टक्कलही पडते. (हेही वाचा, केस गळणे कमी करण्यास मदत करतील हे 5 हेल्दी ज्यूस)
संप्रेरकातील बदलः या प्रकारात प्रामुख्याने महिलांना अधिक तोंड द्यावे लागते. ज्यामध्ये गर्भधारणेदरम्यान, बाळाचा जन्म, रजोनिवृत्ती किंवा थायरॉईड बिघडलेले कार्य यासारखे संप्रेरक असंतुलन केस गळण्यास कारणीभूत ठरू शकते.
वैद्यकीय स्थितीः काही वैद्यकीय स्थिती, जसे की स्वयंप्रतिकार रोग (e.g., अलोपेसिया एरियाटा) थायरॉईड विकार आणि त्वचेचे संक्रमण, यामुळेही केस गळू शकतात. (हेही वाचा, Mira Road: नवऱ्याने टक्कल असल्याचे लपवल्याने नवविवाहित महिलेकडून पोलिसांत तक्रार दाखल; मिरा रोड येथील घटना)
औषधे आणि उपचारः केमोथेरपी औषधे, रक्त पातळ करणारी औषधे आणि उच्च रक्तदाबावरील औषधे यासह काही औषधे, दुष्परिणाम म्हणून केस गळू शकतात.
तणावः तीव्र शारीरिक किंवा भावनिक तणाव टेलोजेन इफ्लुवियम म्हणून ओळखल्या जाणार्या तात्पुरत्या गळतीच्या टप्प्याला चालना देऊ शकतो.
पोषणविषयक कमतरता: लोह, जस्त, बायोटिन आणि प्रथिनांच्या कमतरतेमुळे सुद्धा केस गळू शकतात.
केशरचना पद्धतीः वेणी, केस विंचरण्याच्या, भांग पाडण्याच्या पद्धती, त्यासाठी वापरलेले कंगवे, पीना, टाचण्या किंवा यासारख्या घट्ट केशरचना आदी कारणांमळेही केस दुखावले जातात आणि पुढे ते गळतातही.
त्वचारोगतज्त्राची मदत केव्हा घ्यावी?
तुमचे केस प्रमाणापेक्षा अधिक गळत असतील, याशिवाय त्वचेशी संबंधितही आजार सतावत असतील, जसे की, डोक्यात खाजवणे, जखमा होणे, शरीरावर चट्टे अथवा इतर लक्षणे दिसू लागणे. अशा वेळी त्वचारोगतज्ज्ञ किंवा आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ते तुमच्या केस गळतीच्या मूळ कारणाचे अचूकपणे निदान करू शकतात आणि योग्य उपचार पर्यायांची शिफारस करू शकतात.
Disclaimer: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने देण्यात आला आहे. त्यास वैद्यकीय सल्ला मानला जाऊ नये. आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि कोणताही उपचार घेण्यापूर्वी नेहमी डॉक्टर आणि तज्ज्ञांकडून वैद्यकीय सल्ला घ्यावा. लेटेस्टली कोणत्याही औषध, उपचारपद्धती अथवा अजारांच्या तपशीलाबाबत माहिती पुरवत नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)