Disease X: Davos 2024 मध्ये जगभरातील नेत्यांनी चर्चा केलेली हा आजार नेमका कोणता? WHO ची जाणून घ्या भूमिका

Doctor | Pixabay.com

कोविड 19 च्या संकटानंतर आता जगात Disease X धुमाकूळ घालणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आजाराचा सामना करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना तयारी करत आहे. यंदाच्या Davos मधील World Economic Forum मध्ये या संभाव्य आरोग्य संकटावर देखील चर्चा करण्यात आली आहे. WHO च्या अंदाजानुसार या आजारामुळे कोविडच्या 20 पट अधिक मृत्यूंची नोंद होऊ शकते. 15-19 जानेवारी दरम्यान होत असलेल्या World Economic Forum मध्ये त्याची चर्चा झाली आहे. नक्की वाचा: Disease X: एक्स आजाराबद्दल तुम्हाला माहिती आहे? खरोखरच आणू शकतो पुढची महामारी? 

Disease X काय आहे?

Disease X हा विशिष्ट आजार म्हणून अद्याप समोर आलेला नाही पण infectious agent वरून त्याचं हे नाव ठेवण्यात आलं आहे. सध्या याची माहिती नसली तरी मनुष्यजातीला याआजारात गंभीर microbial threat आहे. यामध्ये वन्यजीवांमध्ये प्रसारित विषाणूंचा एक मोठा साठा आहे जो नवीन संसर्गजन्य रोगाचा स्त्रोत बनू शकतो ज्याचा सामना करण्याची मानवामध्ये प्रतिकारशक्ती नाही.

2018 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने अलर्ट दिला आहे. Disease X च्या दृष्टीने रिसर्च सुरू केला आहे. SARS आणि Ebola प्रमाणे याचा सामना करण्याची देखील तयारी सुरू आहे. कोविड 19 मुळे जगभरात 7 मिलियन लोकांचा मृत्यू झाला होता. आता नवं जागतिक आरोग्य संकट सुमारे 50 मिलियन लोकांचा जीव घेऊ शकतं. New Deadly COVID-19-Like Virus: चीन करत आहे नवीन प्राणघातक COVID-19 सारख्या विषाणूचा प्रयोग; उंदरांसाठी ठरला 100 टक्के घातक- Reports.

दावोस मध्ये काय झाली चर्चा?

दावोस च्या समिट मध्ये आरोग्य तज्ञांनी Disease X च्या दृष्टीने तयारीचा आढावा घेतला आहे. या आजाराचा धोका कळू शकला तर प्रत्येक राष्ट्राच्या स्तरावर त्यांना संशोधन आणि तयारी करता येऊ शकते. काहींच्या मते यामुळे अनाठायी चिंता पसरू शकते पण भविष्यातील धोका ओळखून तयारी ठेवणं केव्हाही चांगलं असं मत WHO Director-General Tedros Adhanom Ghebreyesus यांनी मांडलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, WHO ने आधीच यासाठी तयारी केली आहे. यामध्ये पॅन्डेमिक फंड, साऊथ आफ्रिकेमध्ये “technology transfer hub” याची तयारी आहे. यामुळे लस निर्मिती वाढवता येऊ शकते. परिणामी मोठ्या प्रमाणात आणि अल्प उत्पन्न असलेल्या देशात लस निर्मिती करण्याला मदत होईल.

AstraZeneca चे Michel Demare, chair of the board यांनी कंपनी साथीच्या आजाराच्या व्यवस्थापनासाठी शिफारसी सादर करण्यासाठी जगभरातील आरोग्य प्रणालींचे मूल्यांकन करण्यासाठी काम करत आहे अशी माहिती दिली आहे.

जागतिक आरोग्य संकटाचा सामना कसा करू शकाल?

जागतिक आरोग्य संकटाचा सामना करण्यासाठी जागतिक स्तरावर संशोधनाची गरज आहे. प्रत्येक राष्ट्रीय स्तरावर देखील प्रयत्न सुरू करण्याची गरज बोलून दाखवली आहे. अशा योजनांमध्ये रुग्णालयाची क्षमता कशी वाढवायची, उपचारांचा पुरवठा कसा वाढवायचा आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांना मदत करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे यांचा समावेश असू शकतो.

युरोपियन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने महामारीसाठी नवीन सिस्टीम विकसित करण्याऐवजी सध्याची सिस्टीम मजबूत करण्याची शिफारस केली आहे आणि नवीन साथीच्या आजारापूर्वी कोणत्याही नवीन सिस्टीमची चाचणी घेण्यास प्रोत्साहन दिले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif