Coronavirus Can Infect Brain: कोविड-19 विषाणूमुळे वाढू शकतो मेंदूच्या संसर्गाचा धोका; संशोधनातून समोर आली धक्कादायक बाब

नेचर मायक्रोबायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित केलेला अभ्यास स्पाइक प्रोटीनच्या विशिष्ट भागावर केंद्रित आहे.

Coronavirus | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Coronavirus Can Infect Brain: केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगाला कोविड-19 (Covid-19) चा फटका बसला आहे. कोरोनामुळे जगभरात लाखो लोकांनी आपला जीव गमावला आहे. कदाचित अशी महामारी गेल्या काही दशकात कोणी पाहिली नसेल. सध्या कोविडचा धोका संपला आहे, पण त्याचा प्रभाव अजूनही दिसून येत आहे. कोविड 19 च्या धोकादायक विषाणूमुळे मेंदूमध्ये संसर्ग होऊ शकतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. SARS-CoV-2 विषाणू जो कोविड-19 साथीच्या रोगासाठी जबाबदार आहे, तो एखाद्या व्यक्तीच्या मेंदूला संक्रमित करू शकतो. उंदरांवर केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.

संशोधकांनी सांगितले की, विषाणूच्या स्पाइक प्रोटीनमध्ये उत्परिवर्तन झाल्यामुळे ते मेंदूच्या मज्जातंतूंमध्ये पसरू शकते आणि संसर्ग होऊ शकतो. नेचर मायक्रोबायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित केलेला अभ्यास स्पाइक प्रोटीनच्या विशिष्ट भागावर केंद्रित आहे. याला फ्युरिन क्लीवेज साइट म्हणतात. हे सहसा व्हायरसला मज्जातंतूंच्या पृष्ठभागावरील ACE2 रिसेप्टरला बांधून मेंदूमध्ये प्रवेश करण्यास अनुमती देते. मात्र, जेव्हा ही साइट काढून टाकली जाते, तेव्हा व्हायरसला इतर मार्ग शोधावे लागतात. हा दुसऱ्या मार्गाने पेशींमध्ये पोहोचतो, ज्यामुळे मेंदूमध्ये संसर्ग अधिक वेगाने पसरतो. यामुळे काही कोविड रूग्णांमध्ये कधीकधी चक्कर येणे आणि विसरणे यासह अशा प्रकारचे न्यूरोलॉजिकल लक्षणे दिसतात.

संशोधकांनी उंदरांवर केलेल्या संशोधनानंतर ही समस्या समोर आली आहे. संशोधनात, या उंदरांना SARS-CoV-2 ने संक्रमित केल्यानंतर, शास्त्रज्ञांनी फुफ्फुस आणि मेंदूच्या दोन्ही ऊतकांमधील विषाणूजन्य जीनोमचे विश्लेषण केले. हे स्पष्ट झाले की, फ्युरिन क्लीव्हेज साइट उत्परिवर्तनासह विषाणू मेंदूच्या मज्जातंतूंवर परिणाम करतात. (हेही वाचा: Delhi Air Pollution: खराब हवेमुळे तब्बल 8 वर्षांनी कमी होत आहे दिल्लीकरांचे आयुष्य; अहवालातील धक्कादायक खुलासा)

लोकांच्या आरोग्य सुरक्षेबाबत हे संशोधन करण्यात आले. मात्र, हे संशोधन उंदरांवर करण्यात आले असून ते मानवांसाठीही सत्य आहे हे सिद्ध करणे आवश्यक आहे. शास्त्रज्ञ सध्या हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की, उत्परिवर्तनानंतर कोरोनाव्हायरस मेंदूमध्ये प्रवेश करण्याची अधिक शक्यता का होते. असा अभ्यास उंदरांवर केला जातो, कारण ते जैविक दृष्ट्या मानवांसारखेच असतात. दरम्यान, सुरुवातीच्या संसर्गानंतर अनेक महिने व्हायरस शरीरात टिकून राहतो, मात्र या दीर्घ कोविडची नेमकी कारणे काय आहेत? त्याची मेंदूवर परिणाम करणारी लक्षणे काय आहेत? या सर्व प्रश्नांवर जगभरात व्यापक अभ्यास केला जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif