iNCOVACC Vaccine Price: Bharat Biotech च्या नाकावाटे दिल्या जाणार्‍या लसीसाठी मोजावे लागणार 'इतके' रूपये!

Bharat Biotech ची iNCOVACC ही लस मूळ किंमत 800 रूपये त्यावर 5% जीएसटी आणि लस देण्याचा इस्पिस्थळांचा सेवा खर्च अशी किंमत धरून अंदाजे 1000 रूपयांच्या आसपास जाणार आहे

Bharat Biotech (Photo Credits: Wikimedia commons)

भारताचा कोविड 19 विरूद्धचा (COVID 19) लढा बळकट करण्यामध्ये प्रतिबंधक लसींचा मोठा वाटा आहे. आता जगात पुन्हा कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांनी बुस्टर डोस घेऊन स्वतःला सुरक्षित करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. आता लसीकरणामध्ये शरीरात लस टोचून घेण्यासोबतच नाकावाटे देखील लस देण्यासाठी iNCOVACC ला परवानगी दिली आहे. Bharat Biotech ची iNCOVACC ही लस नाकावाटे दिली जाणार आहे. मागील आठवड्यातच त्याला मंजुरी देत आता कोविन अ‍ॅपवर (CoWIN App) देखील उपलब्ध झाली आहे. दरम्यान आता या लसीचे दर समोर आले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, Bharat Biotech ची iNCOVACC ही लस मूळ किंमत 800 रूपये त्यावर 5% जीएसटी आणि लस देण्याचा इस्पिस्थळांचा सेवा खर्च अशी किंमत धरून अंदाजे 1000 रूपयांच्या आसपास जाणार आहे. केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या नियमावलीत खाजगी हॉस्पिटल्स लस देण्यासाठी कमाल 150 रूपयांपर्यंत सेवाशुल्क आकारू शकतात.

पहा ट्वीट

भारत सरकारने नाकावाटे दिली जाणारी लस मंजूर केली आहे. ही हेटरोलॉगस बूस्टर म्हणून वापरले जाणार असून खाजगी रुग्णालयांमध्ये प्रथम उपलब्ध होईल. तसेच कोविड लसीकरण कार्यक्रमात त्याचा समावेश केला जाईल अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे.

नेसल व्हॅक्सिन - BBV154 - हीटरोलॉगस बूस्टर डोस म्हणून 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रतिबंधित वापरासाठी नोव्हेंबरमध्ये ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून मंजूरी झाली आहे. ही लस देणं सोप्प आहे. आणि शरीरात श्वसनमार्गांत ही लस देऊन विषाणूंचा तेथून होणारा प्रवेश रोखण्यात मदत होते. शरीरात रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत होते. नक्की वाचा: How To Book Booster Dose: बूस्टर डोस कसा बुक करावा? कोविड बूस्टर डोससाठी Co-WIN वर 'या' सोप्या स्टेप्सने करा नोंदणी .

भारतामम्ध्ये यापूर्वी कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिनचे दोन डोस घेतलेले नागरिक आता थेट ही नेसल लस देखील घेऊ शकणार आहेत. या लसीच्या क्लिनिकल ट्रायलचे अहवाल सकारात्मक आहेत.

भारतामध्ये अद्याम नव्या व्हेरिएंटचा धुमाकूळ पहायला मिळत नसला तरीही नागरिकांनी हलगर्जीपणा करू नये. हात वारंवार धुवावे, मास्क वापरावा, सोशल डिस्ट्न्सिंग पाळावे असे आवाहन केले आहे.