IPL Auction 2025 Live

Happy Diwali 2023 Messages: दिवाळीच्या शुभेच्छा मराठी Greetings, Images, Wishes द्वारा शेअर करत आनंद करा द्विगुणीत

जिथे खूप मेहनत, प्रामाणिकता व कृत्यज्ञतेचा भाव आहे, तिथेच तिचा वास असतो. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते.

Happy Diwali 2023 Messages (File Image)

‘दिवाळी’ (Diwali 2023) हा हिंदू धर्मियांचा वर्षातील सर्वात मोठा सण समजला जातो. तब्बल 5 दिवस चालणारा हा प्रकाशाचा सण भारतासह संपूर्ण जगात मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतो. अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक म्हणून हा सण ओळखला जातो. या उत्सवाच्या प्रत्येक दिवसाचे विशेष असे महत्व आहे. या काळात धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) आणि भाऊबीज असे सण साजरे होतात. दिवाळीचा तिसरा आणि सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन (Lakshmi Pujan 2023). या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो. अमावस्या असूनही या दिवसाला अतिशय शुभ मानले जाते.

यंदा रविवारी 12 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी एकाच दिवशी साजरे केले जाणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर माता लक्ष्मीची खास पूजा केली जाते. यासह, भगवान विष्णू, माता सरस्वती आणि गणपती, धान्य, पैसे, बत्ताशे, केरसुणी यांचीही विधीवत पूजा होते. लक्ष्मी देवी या दिवशी पृथ्वीतलावर भ्रमण करून भरभराट व समृद्धीच्या आशिर्वादाची लूट करते असे मानले जाते. समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा या रात्री केली जाते.

तर दिवाळीच्या या खास प्रसंगी SMS, Messages, Greetings, GIFs, Images, WhatsApp Stickers, Wishes शेअर करून द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा-

Happy Diwali 2023 Messages
Happy Diwali 2023 Messages
Happy Diwali 2023 Messages
Happy Diwali 2023 Messages

Happy Diwali 2023 Messages

(हेही वाचा: Lakshmi Pujan Rangoli Designs: लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीच्या पावलांची कशी बनवाल आकर्षक रांगोळी?)

दरम्यान, लक्ष्मी ही चंचल आहे व ती स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर लक्ष्मीपूजन केले जाते. जिथे खूप मेहनत, प्रामाणिकता व कृत्यज्ञतेचा भाव आहे, तिथेच तिचा वास असतो. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते. तसेच या दिवशी नवी केरसुणी विकत घेण्याची प्रथा आहे. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी शिंपडून, हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. या केरसुणीने घर स्वच्छ होवून घरातील अलक्ष्मी म्हणजे दारिद्य्र दूर होते असे मानले जाते.

Tags

Deepavali Deepawali Deepawali 2023 diwali Diwali 2023 Diwali 2023 Special Diwali 2023 Wishes In Marathi Diwali Digital Wishes Diwali Messages Diwali Quotes Diwali Special Diwali Wishes Diwali Wishes in Marathi Happy Deepawali Happy Diwali Happy Diwali 2023 Happy Diwali 2023 HD Greetings Happy Diwali 2023 HD Images Happy Diwali 2023 HD Wallpapers Happy Diwali 2023 Messages in Marathi Happy Diwali 2023 Wishes in Marathi Happy Diwali Greetings Happy Diwali Images Happy Diwali Marathi Wishes Happy Diwali Messages Happy Diwali Quotes Happy Diwali Wallpapers Happy Diwali Wishes Happy Diwali Wishes in Marathi Happy Diwali Wishes In Marathi Text Happy Narak Chaturdashi Wishes Lakshmi Puja Lakshmi Puja 2023 Bhai Dooj Laxmi Puja Laxmi Puja 2023 Narak Chaturdashi Shubh Deepavali Shubh Deepavali 2023 Shubh Deepawali Shubh Deepawali Wishes Subh Deepawali दिवाळी 2023 दिवाळी 2023 च्या शुभेच्छा दिवाळी मराठी मेसेज दिवाळी मराठी शुभेच्छा दिवाळी मराठी शुभेच्छा फोटो दिवाळी मराठी शुभेच्छा संदेश दिवाळी मराठी संदेश दिवाळीच्या शुभेच्छा दिवाळीच्या शुभेच्छा 2023 HD प्रतिमा दिवाशी मराठी संदेश दीपावली दीपावली 2023 दीपावली Messages दीपावली Wishes दीपावली च्या शुभेच्छा दीपावली मराठी मेसेज दीपावली मराठी शुभेच्छा दीपावली मराठी संदेश दीपावली शुभेच्छा संदेश दीपावलीच्या शुभेच्छा शुभ दिवाळी 2023 HD वॉलपेपर शुभ दिवाळी 2023 HD शुभेच्छा शुभ दीपावली शुभ दीपावली मराठी शुभेच्छा शुभ दीपावली शुभेच्छा सण आणि उत्सव