Onion Tea For Sore Throat: कांदा भजी ऐकली होती! पण, कांद्याचा चहा? घसा खवखवणे, दुखणे यावर प्रभावी आहे म्हणे, घ्या जाणून

पण अलिकडेच काही तज्ज्ञांनी एक वेगळाच उपाय सूचवला आहे. ज्यामध्ये तुम्हाला घ्यावा लागेल कांद्याचा चहा (Onion Tea)! तुम्ही म्हणाल कांदा भजी (Kanda Bhaji) ऐकली होती. पण, कांद्याचा चहा? म्हणूनच जाणून घ्या काय आहे हा प्रकार.

Onion Tea For Throat Infection | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Home Remedy For Throat Infection: घसा खवखवणे, दुखणे, त्याला सूज येणे अशा समस्या अनेकदा संसर्गामुळे उद्भवतात. ही बाब एक सामान्य अस्वस्थता आहे. विशेषत: हवामानातील बदल आणि हिवाळ्याच्या काळात या समस्या अधिक जाणवतात. ज्यामुळे घशात वेदना, कोरडेपणा आणि ओरखडे (Sore Throat Remedies) यासारख्या लक्षणांमुळे तोंडात घेतलेला घास गिळण्यात अडचण येते आणि आवाजही बदलून जातो. ही लक्षणे दूर करण्यासाठी, अनेक घरगुती उपचारांची शिफारस केली जाते. ज्यामध्ये गरम पाण्याच्या गुळण्या, वाफ किंवा तत्सम उपाय. पण अलिकडेच काही तज्ज्ञांनी एक वेगळाच उपाय सूचवला आहे. ज्यामध्ये तुम्हाला घ्यावा लागेल कांद्याचा चहा (Onion Tea)! तुम्ही म्हणाल कांदा भजी (Kanda Bhaji) ऐकली होती. पण, कांद्याचा चहा? म्हणूनच जाणून घ्या काय आहे हा प्रकार.

घसा खवखवणे कांद्याने बरा होते?

नियमीत प्यायला जाणारा चहा सर्वांनाच महिती आहे. सांगीतले जाते की, कांद्याचा चहा घसा घवखवणे, दुखणे किंवा तत्सम त्रासासाठी प्रभावी उपाय ठरु शकतो. न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी आपल्या इंस्टाग्रामवर पेजवर अलीकडेच कांद्याचा चहा घेण्याचे फायदे सामायिक केले आहेत. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, तुम्हाला माहित आहे का घसा खवखवणे कांद्याने बरा होते?

कांदा: सर्वात शक्तिशाली नैसर्गिक प्रतिजैवक

आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये बत्रा म्हणतात, कांदा, जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरातील मुख्य पदार्थ. ते केवळ चव वाढवणारे नाहीत तर व्हिटॅमिन सी, बी जीवनसत्त्वे, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांनी देखील परिपूर्ण आहेत. "कांद्याचा चहा प्यायल्याने तुम्हाला घसादुखीपासून अत्यंत आवश्यक आराम मिळू शकतो. कांद्याला सर्वात शक्तिशाली नैसर्गिक प्रतिजैविक मानले जाते, जे व्हायरल आणि बॅक्टेरिया या दोन्ही संसर्गांशी लढा देऊ शकते आणि घसा खवखवण्याची लक्षणे कमी करू शकते. कांद्यामध्ये सल्फर असते. संयुगे जे श्लेष्माशी लढण्यास मदत करतात आणि आपल्या वायुमार्गातून बाहेर काढण्यास प्रोत्साहन देतात. (हेही वाचा, Masala Chai ठरला अल्कोहल फ्री पेयांच्या यादीमध्ये दुसरं लोकप्रिय ड्रिंक)

कांदा चहा रेसीपी

कांदा चहा तयार करणे ही एक सोपी प्रक्रिया आहे.

अर्धा कांदा एक कप पाण्यात उकळवा, गाळून घ्या आणि दिवसातून दोनदा प्या.

तुमच्या आवश्यकता आणि आवडीनुसार लिंबाचा रस आणि मध टाकल्याने त्याची चव वाढते आणि घसा आणखी शांत होतो. शक्य झाल्यास तुम्ही त्यात काहीही न टाकता पूर्णपणे कांद्याचा चाहाही गेऊ शकता.

इनस्टाग्राम पोस्ट

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Lovneet Batra (@lovneetb)

घसादुखीपासून आराम देण्याव्यतिरिक्त, कांदे अतिरिक्त आरोग्य फायदे देतात. पोटॅशिअमने समृद्ध, ते रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यासाठी योगदान देतात आणि मधुमेहासाठी फायदेशीर असतात.

(वाचकांसाठी सूचना: आमच्या वाचकांसाठी सूचना (Disclaimer) अशी की, इथे दिलेला मजकू केवळ सामान्य माहिती म्हणून आहे. कोणत्याही आजारासाठी कांद्याचा चाहा घ्यावा असे आम्ही सूचवत नाही, तसेच वरील मजकूराची आम्ही शाहनिशाही केली नाही. परिणामी मजकूर वाचून कोणतीही कृती करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वैज्ञानिक दृष्टीकोण कायम ठेवा. लेटेस्टली मराठी या माहितीची जबाबदारी स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif