पावसाळ्यात बाजारात येणारी शेवग्याची शेंग तुमच्या जीवनात घडवेल जादू, वाचा या भाजीचे दहा भन्नाट फायदे

जाणून घ्या या जादुई शेंगेचे काही भन्नाट फायदे..

Monsoon Seasonal Vegetable Drumstick (Photo Credits: Facebook)

इडली- वड्यासोबत दिल्या जाणाऱ्या सांबारात आवर्जून वापरला जाणारी भाजी म्हणजे शेवग्याची शेंग (Drumstick) . कोकण विभागात ही शेंग डांबे या नावाने सुद्धा ओळखली जाते. नावं जरी वेगळी असली तरी या शेंगेचे फायदे मात्र भारीच गुणकारी आहेत. पुराणातील काही लेखांमध्ये तर या भाजीचा उल्लेख तब्बल 300 रोगांवर उपचार करणारी जादुई शेंग असा करण्यात आला आहे. शेवग्याच्या शेंगेत व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते यासोबतच यामध्ये बीटा केरेटीन, प्रोटीन, मीठ, मँगनीज, मँग्नेशियम , पोटॅशियम आणि फायबर हे शरीरावश्यक घटक सुद्धा मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी ही शेंग एक जादूची कांडी आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, शेवग्याची शेंग ही वैवाहिक जीवनातील महत्वाची बाब म्हणजेच सेक्स लाईफ च्या समस्या दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला तर मग पाहुयात या जादुई शेंगेचे काही भन्नाट फायदे..

-शेवग्याच्या शेंगेला तुमच्या जेवणात समाविष्ट करण्याने सेक्स लाइफला बराच फायदा होतो. या भाजीच्या सेवनाने वीर्यातील शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते. यासोबतच तुपात बनवलेली शेवग्याची भाजी ही वीर्यात सुधारणा आण्यासाठी ओळखली जाते. तोंडाला येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी करा हे 10 घरगुती उपाय

- शेवग्याची शेंग नियमित खाल्ल्यास मासिक पाळीच्या संबंधित अडचणी दुर होतात

-गरोदर महिलांनी तर शेवग्याची भाजी किंवा शेंग याचे नियमित सेवन करायला हवे त्यामुळे तुमच्या येणाऱ्या लहान पाहुण्याची तब्येत उत्तम होते, याशिवाय प्रसूती वेदना कमी होण्यास मदत होते.

-मुळातच शेवग्याच्या शेंगेमध्ये इतकी पोषकतत्वे असल्यामुळे त्यामुळे तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढते . याशिवाय तुमचा बेडमधील स्टॅमिना वाढवायला ही भाजी मदत करते.  अशक्तपणा दूर करण्यासाठी आहारात समाविष्ट करा ह्या पाच गोष्टी

- शेवग्याच्या शेंगांसोबतच या झाडाची कोवळी पानं व फुलांची सुद्धा भाजी बनवता येते, या भाजीमुळे त्वचेशी संबंधित आजारांपासून मुक्ती मिळू शकते, नितळ त्वचा व लांब सडक केसांसाठी ही भाजी तुपामध्ये बनवल्यास अधिक फायदा होतो.

- शेवग्याच्या शेंगेत फायबरचे प्रमाण मुबलक असल्याने यामुळे पाचनप्रक्रिया सुधारते. बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास तुम्हाला ही भाजी खायलाच हवी.

-जर का तुम्हाला श्वसनात अडथळा येथ असेल किंवा दम्याचा त्रास असेल तर तुम्ही शेंगा टाकलेलं सूप पिऊ शकता, यामुळे तुमच्या समस्यांवर बराच आराम मिळतो.

-सर्दी, खोकला किंवा कफ झाला असल्यास शेवग्यांची शेंग घरगुती उपचार करू शकते. या शेंगाना किंवा पाल्याला गरम पाण्यात टाकून त्याची वाफ घेतल्यास बंद नाक व छातीला गरम शेक मिळतो. शुद्ध मध ओळखण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स जाणून घ्या

-शेवग्याच्या शेंगेमुळे शरीरातील रक्तपेशी किंवा हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. याशिवाय रक्त शुद्धीकरणात सुद्धा मदत होते.

-शरीरातील सर्वच अवयव जसे की लिव्हर, मेंदू, हृदय, दात, हाडे मजबूत करण्यात शेवग्याची शेंग फायदेशीर ठरते.

शेवगा ही खरतर सीजन मध्ये खाल्ले जाणारी भाजी आहे. पावसाळ्यात बाजारात शेवगा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. त्यामुळे जर का तुम्हाला तुमच्या आरोग्यात सुद्धार घडवायचा असेल तर आजपासूनच या चविष्ट भाजीचे सेवन सुरु करा.

(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये.)