Women’s Equality Day 2022 : महिला समानता दिनाची तारीख, इतिहास आणि महत्व, जाणून घ्या
एकोणिसाव्या घटनादुरुस्तीला मान्यता देण्यात आली, ज्यामुळे देशात महिलांना मुक्तपणे मतदान करण्याचे स्वातंत्र्य मिळाले होते, जाणून घ्या संपूर्ण इतिहास
Women’s Equality Day 2022 Date, History and Significance: युनायटेड स्टेट्स येथे महिलांना अधिकृतपणे मतदार घोषित केले होते. 1920 पासून महिला समानता दिवस साजरा केला जातो. एकोणिसाव्या घटनादुरुस्तीला मान्यता देण्यात आली, ज्यामुळे देशात महिलांना मुक्तपणे मतदान करण्याचे स्वातंत्र्य मिळाले होते. हा दिवस तमाम महिलांच्या कर्तृत्वालाही सूचित करतो, ज्यांच्यामुळे आजपर्यंत आपण प्रेरणा घेत आहोत. महिलांनी केलेल्या चळवळीमुळे आज महिला प्रत्येक क्षेत्रात मोलाची कामगिरी करत आहेत, महिला समानता दिवसाची तारीख आणि महत्त्व जाणून घेण्यासाठी पुढे वाचा. [हे देखील वाचा: Ganeshotsav 2022 Dates: हरतालिका, ज्येष्ठा गौरी पूजन ते अनंत चतुर्दशी यंदा गणेशोत्सवातील पहा महत्त्वाच्या सणांच्या तारखा!]
महिला समानता दिवसाची तारीख ?
महिला समानता दिवस दरवर्षी 26 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. 26 ऑगस्ट रोजी 1920 मध्ये महिलांना अधिकृतपणे यूएस संविधानात मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्यानंतर हा दिवस महिला समानता दिवस म्हणून साजरा केला जातो.
महिला समानता दिवसाचा इतिहास
महिलांना नागरिक म्हणून अधिकार मिळवून देण्यासाठी 72 वर्षांच्या संघर्षाचा आणि मोठ्या नागरी हक्क चळवळीने केलेल्या मोहिमेचा हा परिणाम होता. युनायटेड स्टेट्स कॉंग्रेसने स्थापन केलेल्या ‘महिला समानता दिन’ पाळण्यास सर्वप्रथम १९७३ मध्ये मान्यता देण्यात आली होती आणि तेव्हापासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
महिला समानता दिनाचे महत्त्व
भूतकाळातील महिलांच्या संघर्षांना आणि नेतृत्वाला लक्षात घेऊन हा दिवस साजरा केला जातो. सध्याच्या परिस्थितीतही खर्या अर्थाने समानता मिळवण्यासाठी झगडणाऱ्या महिलांच्या सततच्या प्रयत्नांवरही या दिवसामुळे प्रकाश टाकण्यास मदत होते. हा दिवस स्त्रियांना समान रोजगार आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी धडपडणार्या संघटनांच्या प्रयत्नांना आणि महिलांवरील भेदभावाची हिंसक कृत्ये रोखण्यासाठी, संस्थांच्या प्रयत्नांना देखील चिन्हांकित करतो. महिलांना काही अधिकार देण्यासाठी महिला हक्क चळवळींच्या प्रयत्नांबद्दल तसेच महिला नेत्यांच्या कर्तृत्व आणि शिकवणींनंतर हा दिवस साजरा केला जातो, अधिकारांसाठी झगडणाऱ्या महिलांना समान दर्जा नसल्याबद्दल अनेक महिलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते कारण निम्म्या लोकसंख्येला इतकी वर्षे नागरिक म्हणून का ओळखले गेले नाही? असा सवाल विचारत चळवळ केली होती.