Tulsi Vivah Special Rangoli 2019: यंदा तुळशी विवाहानिमित्त काढा ‘या’ विशेष रांगोळी डिझाईन्स (Watch Video)

दिवाळीचा सण संपेपर्यंत दारासमोर रांगोळी काढण्याची प्रथा आहे. अलिकडे सणानुसार विशेष रांगोळी काढली जाते. यंदा तुम्हीही तुळशी विवाहानिमित्त स्पेशल तुळशी वृंदावन असलेली रांगोळी काढण्याचा विचार करत असाल तर हा खास लेख तुमच्यासाठी.

तुळशी विवाह विशेष रांगोळी डिझाईन्स Photo Credit : Instagram

Tulsi Vivah Special Rangoli 2019: दिवाळीच्या दिवसांत रांगोळीला अनन्य साधारण महत्त्व आहे. दिवाळीचा सण संपेपर्यंत दारासमोर रांगोळी (Rangoli) काढण्याची प्रथा आहे. अलिकडे सणानुसार विशेष रांगोळी काढली जाते. दिवाळीला दिव्यांची रांगोळी, भाऊबीजेला स्पेशल भाऊ-बहिणीची रांगोळी तर तुळशी विवाहाच्या दिवशी स्पेशल तुळशी वृंदावन असलेली रांगोळी काढली जाते. यंदा तुम्हीही तुळशी विवाहानिमित्त स्पेशल तुळशी वृंदावन असलेली रांगोळी काढण्याचा विचार करत असाल तर हा खास लेख तुमच्यासाठी. यावर्षी तुळशी विवाह सोहळा 9 नोव्हेंबरला सुरू होणार असून 12 नोव्हेंबरला त्याची समाप्ती होणार आहे. तुळशी विवाहामध्ये वधूच्या रूपात तुळशीला सजवून तिचा विवाह शाळीग्राम दगडाशी लावण्याची प्रथा आहे. शाळीग्राम हा विष्णू असल्याचं समजत जातं. काही ठिकाणी घरातील लहान मुलाचा तुळशीसोबात विवाह लावला जातो.

तुळशी विवाह स्पेशल रांगोळ्या  - 

अशाप्रकारे तुम्ही वरील रांगोळ्यांचे व्हिडिओ पाहून अगदी सोप्या पद्धतीने रांगोळी काढू शकता. तुळशी विवाहावेळी तुमची स्पेशल रांगोळी सर्वांचेच लक्ष वेधून घेईल. तुळशी विवाह हा हिंदूधर्मियांसाठी एक पवित्र सोहळा समजला जातो. कार्तिकी व्दादशीच्या मुहूर्तावर तुळस आणि विष्णूचा विवाह झाल्याची अख्यायिका आहे. ज्यांचा विवाह झाला आहे, अशा लोकांनी तुळशी विवाह करणं गरजेचं असतं. तुळशी विवाह केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांतता नांदते. तसेच धनलाभही होतो. विवाहित जोडप्याने तुळशी विवाह करणं खूप गरजेचं आहे. तुळशी विवाह केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. (सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)