Pune: विजयादशमी निमित्त श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला नेसवली चक्क सोन्याची साडी, पहा फोटो
याबद्दल अधिक माहिती देताना मंदिराचे कार्यकर्ते दीपक वानरसे यांनी असे म्हटले की, 11 वर्षांपूर्वी एका भक्ताने ही सोन्याची साडी दिली होती.
Pune: महाराष्ट्रातील पुणे येथील श्री महालक्ष्मी मंदिरात विजयादशमी निमित्त देवीला चक्क सोन्याची साडी नेसवण्यात आली आहे. याबद्दल अधिक माहिती देताना मंदिराचे कार्यकर्ते दीपक वानरसे यांनी असे म्हटले की, 11 वर्षांपूर्वी एका भक्ताने ही सोन्याची साडी दिली होती. देवीला फक्त विजयादशमी आणि लक्ष्मी पूजेच्या वेळीच ही सोन्याची साडी नेसवली जाते. या साडीचे वजन 16 किलोग्रॅम आहे.(Happy Dussehra 2021 Wishes in Marathi: विजयादशमी निमित्त खास मराठी Messages, Greetings, HD Images शेअर करून द्या शुभेच्छा; द्विगुणीत करा दसऱ्याचा आनंद)
राज्यासह सर्वत्र विजयादशमीचा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. तसेच मंदिरांना सुद्धा सुंदर सजावट आणि रोषणाई केली जाते. अशातच पुण्यातील या मंदिरांची एक वेगळीच ओळख आहे. विजयादशमीच्या खास दिनानिमित्त सोन्याची साडी नेसवली जाते. गेल्या 11 वर्षांपासून ही परंपरा सुरु असल्याचे ही सांगण्यात आले आहे.(Shirdi Sai Baba Punyatithi 2021 HD Images: शिर्डीच्या साई बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त Messages, Wishes शेअर करून करा त्यांना अभिवादन)
Tweet:
देवीला 16 किलोग्रॅमची ही साडी एका भक्तानी अपर्ण केली होती. तेव्हापासून विजयादशमी आणि लक्ष्मी पूजनावेळी ही साडी देवीला नेसवली जाते. श्री महालक्ष्मी मंदिराचे कार्यकर्ते दीपक वानरसे यांनी म्हटले की, या दिवशी देवीचा खास शृगांर सुद्धा केला जाते. त्याचसोबत भाविक ही देवीच्या आशीर्वादासाठी मंदिरात गर्दी करतात.