Shirdi Sai Baba Punyatithi 2022 Messages: शिर्डीतील साईबाबांच्या पुण्यतिथीनिमत्त Message, WhatsApp Stickers, Facebook Message आणि Greetings शेअर करून करा त्यांना अभिवादन

तर प्रत्येकाच्या इच्छा ते पूर्ण करतात. याच कारणास्तव साईबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमासाठी जगभरातून लाखो लोक शिर्डीत येतात.

Sai Baba Punyatithi 2022 Messages (Photo Credit - File)

हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील लोक शिर्डीच्या साईबाबांच्या प्रति आपला विश्वास आणि आस्था ठेवतात. हेच कारण आहे की, साईबाबांच्या दरबारात नेहमीच भाविकांची दर्शनासाठी रांग लागलेली दिसून येते. असे म्हटले जाते की, श्रद्धा आणि सबुरीचे पाठ वाचणारे साईबाबा त्यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला खाली हाताने पाठवत नाहीत. तर प्रत्येकाच्या इच्छा ते पूर्ण करतात. याच कारणास्तव साईबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमासाठी जगभरातून लाखो लोक शिर्डीत येतात. गेली दोन वर्ष कोरोना व्हायरसच्या संकटामुळे पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविकांना उपस्थितीत राहता आले नव्हते. पण यंदा कोणतेही विषाणूचे संकट नसल्यामुळे साईबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमासाठी जगभरातून लाखो लोक शिर्डीत येवू शकतात.

प्रत्येक वर्षी शिर्डीतील साईबाबा यांच्या पुण्यतिथीचा उत्सव हा विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी साजरी केली जाते. त्याला शिर्डी साईबाबा महासमाधी दिवस नावाने ओखळले जाते. येत्या 5 ऑक्टोंबरला साईबाबांची पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे. मान्यतेनुसार साईबाबा यांनी 15 ऑक्टोंबर 1918 रोजी विजयादशमीच्या दिवशी महासमाधी घेतली होती. तर यंदाच्या शिर्डीतील साईबाबांच्या पुण्यतिथीनिमत्त WhatsApp Stickers, Facebook Message आणि Greetings पाठवत साजरा करा उत्सव. (हे देखील वाचा: Navratri 2022: आज दुर्गा अष्टमी, नवरात्र उत्सवाची आठवी माळ; जाणून घ्या आज कोणता रंग आणि दुर्गा मातेचं कुठलं रुप)

Sai Baba Punyatithi 2022 Messages
Sai Baba Punyatithi 2022 Messages
Sai Baba Punyatithi 2022 Messages
Sai Baba Punyatithi 2022 Messages
Sai Baba Punyatithi 2022 Messages
Sai Baba Punyatithi 2022 Messages

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी या गांवात बाबांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना ‘शिर्डीचे साईबाबा’ म्हणून ओळखले जाते. येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला. साईबाबांचा धर्म कोणता, हे कधीच कोणाला कळले नाही. त्यांचे दिसणे एखाद्या मुसलमान फकिरासारखे होते. शिर्डी येथील एका पडक्या मशिदीत त्यांचे वास्तव्य असे परंतु त्या मशिदीला ते ‘द्वारकामाई’ म्हणत आणि तेथे सदैव एक धुनी पेटलेली असे.

मात्र हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजातील लोकांचा शिर्डीच्या साई बाबांवर विश्वास आणि श्रद्धा आहे. असे म्हटले जाते की श्रद्धा आणि सबुरीचा पाठ शिकवणाऱ्या साई बाबांच्या दरबारातून कोणीच मोकळ्या हाती परत जात नाही. त्यामुळे शिर्डीला बाबांच्या दरबारात नेहमीच भक्तांची रांग असते.