नवरात्रोत्सव 2018 : काय आहे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि विधी ?
पण त्याचसोबतच घरोघरी घटस्थापना केली जाते. यंदा घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे आणि त्यासंबंधित इतर गोष्टी जाणून घेऊया...
श्रावण सुरु होताच आपल्याकडे सणांचा ओघ सुरु होतो. गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर नवरात्रीची आस लागते. यंदा नवरात्रोत्सव 10 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. देवीच्या उपासनेचा आणि साधनेचा हा काळ. या नऊ रात्री आणि दहा दिवसाच्या उत्सवात देवीच्या वेगवेगळ्या रुपांची उपासना केली जाते. नऊ रात्री उत्सव साजरा केला जातो कारण...
नवरात्रोत्सवात सार्वजनिक मंडळांत देवीचे आगमन होतेच. पण त्याचसोबतच घरोघरी घटस्थापना केली जाते. यंदा घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे आणि त्यासंबंधित इतर गोष्टी जाणून घेऊया... प्राचीन कोल्हापूरचा वारसा जपणाऱ्या 'नवदुर्गा'
काय आहे मुहूर्त?
10 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरु होत आहे. या दिवशी सकाळी 6.32 ते दुपारी 1 वाजेपर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त आहे.
कशी करावी घटस्थापना?
- सर्वप्रथम चौरंग किंवा पाटाच्या आकाराची रांगोळी काढून त्यावर हळद कुंकू घालावे. त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा.
- चौरंग/पाट त्यावर लाल वस्त्र अंथरावे.
- टोपल्यात किंवा परातीत माती घालून त्यात मिश्र धान्य पेरावे. मधोमध कलश ठेवावा. कलशात हळद-कुंकू, सुपारी, अक्षता, दुर्वा, सुट्टे पैसे घालावे. कलशाला हळदी कुंकुवाची उभी बोटे उठवावी. कलशात बाजूला विट्याची पाने लावून त्यावर नारळ ठेवावा.
- कलश परातीत किंवा टोपल्यात ठेवून ते चौरंगावर ठेवावे.
- मग हळद कुंकू, अक्षता, फुलं वाहून मनोभावे पुजा करावी.
- प्रत्येक दिवसाला एक अशी फुलांची माळ कलशावर सोडावी.
- दर दिवशी नैवेद्य दाखवून आरती करावी.
- आवड असल्यास नवरात्रीच्या काळात तुम्ही धूप करु शकता.
- परातीत/ टोपल्यात पेरलेल्या धान्यावर दिवसातून दोनदा फुलाने थोडेसे पाणी शिंपडावे. नऊ दिवसात ते जोमाने वाढतात. त्या वाढीनुसार आपल्या घराची भरभराट होते, असे म्हटले जाते.
-पूजा करताना मंत्र जपावा.
ॐ सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते !!
बालिका पूजन
त्याचबरोबर पंचमी किंवा सप्तमीला बालिका पूजन करण्याची प्रथा आहे. या दिवशी लहान मुलींची पूजा करुन त्यांना खाऊ, गिफ्ट द्यावे.
नवरात्रीत अनेकांचा उपवास असतो पण कडक उपवासामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. म्हणून जाणून घ्या : आरोग्याचं गणित सांभाळत नवरात्रीत उपवास कसा कराल ? त्याचबरोबर अनेकजण अनवाणी चालण्याचे व्रत करतात. अनवाणी चालण्याचे व्रत करताना 'अशी' घ्या पायांची काळजी !