Margashirsha Guruvar Vrat 2019 Wishes: मार्गशीर्ष गुरूवार व्रताच्या मराठमोळ्या शुभेच्छा HD Images,Greetings, Messages च्या माध्यमातून शेअर करून साजरे करा मंगलमय पर्व!

येत्या 28 नोव्हेंबरला म्हणजे उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारचे व्रत केले जाणार आहे. कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे, तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी, यासाठी हे व्रत केले जाते.

Margashirsha Guruvar Vrat 2019 Wishes (PC_File Image)

Margashirsha Guruvar Vrat Marathi Wishes: मार्गशीर्ष (Margashirsha) महिन्यात प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत (Mahalakshmi Vrat) केले जाते. येत्या 28 नोव्हेंबरला म्हणजे उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारचे व्रत केले जाणार आहे. कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे, तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी, यासाठी हे व्रत केले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी हे व्रत केले जाते. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. घरातील विवाहित महिला, मुली किंवा पती-पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात. या दिवशी अनेकजण आपल्या मित्र-मैत्रिणींना मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारच्या शुभेच्छा देत असतात. तुम्हालाही तुमच्या मित्र-मैत्रिणींना WhatsApp, Facebook द्वारा Wishes, Messages, Greetings च्या माध्यमातून शुभेच्छा द्यायच्या असतील, तर हा लेख तुमच्यासाठी! (हेही वाचा - Margashirsha Guruvar Vrat 2019 Dates: यंदा मार्गशीर्ष गुरूवार व्रत कोणत्या 4 दिवशी केले जाणार?)

मार्गशीर्ष महिन्यातील

पहिल्या गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा...!

Margashirsha Guruvar Vrat 2019 Wishes (PC_File Image)

तुम्हाला व तुमच्या परिवाराला

मार्गशीर्ष गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा…!

Margashirsha Guruvar Vrat 2019 Wishes 1(PC_File Image)

सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण असा

प्रत्येक दिवस असावा..

येणारा प्रत्येक सण तुमच्या स्वप्नांची पूर्ती

आणि भरभराटीचा असावा हीच देवा चरणी इच्छा…

मार्गशीर्ष गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा!

Margashirsha Guruvar Vrat 2019 Wishes 3 (PC_File Image)

मार्ग - मार्ग नेहमी असा असावा की जिथे

शीर्ष - शीर्ष नेहमी नम्रतेने झुकलेले असावे

गुरु -गुरु असा असावा की ज्याच्याकडून

वार - वारंवार मार्गदर्शन लाभावे!

मार्गशीर्ष गुरुवारच्या तुम्हाला आणि तुमच्या

परिवाराला हार्दिक शुभेच्छा!

Margashirsha Guruvar Vrat 2019 Wishes 4(PC_File Image)

आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरूवार,

तुम्हाला व तुमच्या परिवाराला

महालक्ष्मीव्रताच्या हार्दिक शुभेच्छा!

Margashirsha Guruvar Vrat 2019 Wishes 5 (PC_File Image)

कार्तिक महिना संपल्यानंतर सुरू होणारा हा मार्गशीर्ष महिना यंदा 27 नोव्हेंबर पासून सुरू झाला आहे. तर मार्गशीर्ष महिना 26 डिसेंबर दिवशी संपणार आहे. यंदा 28 नोव्हेंबर 2019 पहिला गुरूवार,  5 डिसेंबर 2019 दुसरा गुरूवार तर 12 डिसेंबर ला तिसरा गुरूवार आणि 19 डिसेंबर 2019 चौथा गुरूवार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif