Marathi Rajbhasha Din 2021 HD Images: मराठी राजभाषा गौरव दिन Wishes, Messages, WhatsApp Status; आप्तेष्ठांना द्या शुभेच्छा

माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। असे संत ज्ञानेश्वर​ यांनी वर्णन केलेल्या मराठी भाषेचा आज गौरव दिन.

मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा (Photo Credits-File Image)

Marathi Rajbhasha Din 2021 Images:  माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। असे संत ज्ञानेश्वर​ यांनी वर्णन केलेल्या मराठी भाषेचा आज गौरव दिन. मराठी साहित्य विश्वातील थोर कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी (27 फेब्रुवारी 202) 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा होतो. या दिवशी राज्य, देश आणि जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी मराठी अस्मिता बाळगणारी मंडळी असतात तिथे तिथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.(Marathi Bhasha Din 2021 Wishes: मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status द्वारे देऊन सातासमुद्रापार पसरू दे मराठी भाषेची महती)

भारत स्वतंत्र झाल्यानंतर पुढे देशात भाषावार प्रांतरचना झाली. त्यानंतर 'महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४' नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे घोषित झाले. पण, कोणत्याही भाषेला राजभाषेचा दर्जा मिळण्यासाठी राष्ट्रपतींची मंजूरी आवश्यक असते. दुर्दैवाने ही मान्यता अद्याप मिळाली नाही. याबबतचा मराठी भाषकांचा लढा अद्यापही कायम आहे.(Marathi Bhasha Din 2021: 'या' कारणामुळे कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो मराठी राजभाषा दिन!)

मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा (Photo Credits-File Image)
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा (Photo Credits-File Image)
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा (Photo Credits-File Image)
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा (Photo Credits-File Image)

साहित्यिक विवा शिरवाडकर यांच्या स्मृतिंना अभिवादन म्हणून 27 फेब्रुवारी हा दिवस

'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय झाला. हा निर्णय 21 जानेवारी 2013 या दिवशी घेण्यात आला.