IPL Auction 2025 Live

Marathi Patrakar Din 2021: 6 जानेवारी हा दिवस 'मराठी पत्रकार दिन' का साजरा केला जातो?

बाळाशास्त्रींचा जन्मदिवस आणि त्यांनी मुहूर्तमेढ रोवत सुरू केलेल्या पत्रकारितेतून पहिलं मराठी दैनिक देखील 6 जानेवारीला प्रसिद्ध झाल्याने हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.

Journalist Day HD Images Wishes (Photo Credits: File)

6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन (Marathi Patrakar Din) म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. 'दर्पण' या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून देशात मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे 'बाळशास्त्री जांभेकर' (Balshatri Janbhekar) यांचा जन्मदिवस आहे. 6 जानेवारी 1812 ला कोकणात एका सामान्य घरात जन्माला आलेल्या बाळशास्त्री यांचे जीवनमान अवघ्या 34 वर्षांचे होते. पण त्यांच्या विचारांचा ठेवा, कार्याची पद्धत आणि समाजात प्रबोधन घडवून आणण्यात मोलाचा वाटा आहे. बाळाशास्त्रींचा जन्मदिवस आणि त्यांनी मुहूर्तमेढ रोवत सुरू केलेल्या पत्रकारितेतून पहिलं मराठी दैनिक देखील 6 जानेवारीला प्रसिद्ध झाल्याने हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. मग आजच्या 'मराठी पत्रकार दिनी' जाणून त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी! नक्की वाचा: Journalist Day HD Images: मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा Wishes, Greetings, Messages, WhatsApp Status च्या माध्यामातून देऊन साजरा करा आजचा पत्रकारिता दिन.

बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल काही खास गोष्टी

भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता असताना त्या सत्तेविरूद्ध उभं राहून देशाची प्रगती, आधुनिक विचार आणि संस्कृतीचा विकास यासाठी वैज्ञानिक ज्ञानाची गरज आहे. सोबतीने सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याच्या विवेकनिष्ठ भूमिकेसाठी शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसाराची आवश्यकता आहे हे काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व बाळशास्त्री जांभेकरांचं निधन मुंबई मध्ये 1846 साली झाले. तेव्हा ते 34 वर्षांचे होते.