Makar Sankranti 2019: मकर संक्रांती दिवशी पतंगबाजी करताना उत्साहाच्या भरात सुरक्षेच्या 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात!

लहानसहान असले तरीही अपघात, इजा टाळण्यासाठी काही खास काळजी घेणं आवश्यक आहे.

Kite Flying | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Kite Flying Safety Rules: मकरसंक्रांतीचा (Makar Sankranti)  सण म्हणजे तिळगूळ, हलवा, हळदीकुंकू हे सारं आलंच पण प्रामुख्याने घरातील लहान मुलांना आणि पुरूषांना या दिवशी पतंगबाजी (Kite Flying)  करण्याची हौस असते. मुंबई, दिल्ली सारख्या मेट्रो शहरांमध्येही टेरेसवर पतंगबाजीचे सामने रंगतात. मात्र उत्साहाच्या भरात हा पतंगबाजीचा (Kite Flying) खेळ घातक ठरू शकतो. लहानसहान असले तरीही अपघात, इजा टाळण्यासाठी काही खास काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणजे हा सण तुमच्यासोबतच इतरांसाठीही आनंददायी ठरेल. Happy Makar Sankranti 2019: मकरसंक्रांतीच्या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी WhatsApp Messages,Greetings, SMS, Facebook Status साठी खास मराठी शुभेच्छापत्रं!

पतंगबाजी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल ?

मकर संक्रांतीच्या दिवशी तीळगुळासोबतच गूळपोळी, तेलपोळी खाल्ली जाते. नवदांम्पत्यांसाठी मकरसंक्रांतीचा सण खास असतो. या दिवशी हलव्याच्या दागिन्यांनी दोघांनाही सजवलं जातं. काळे कपडेघालून मकर संक्रांत साजरी केली जाते. नव्या सूनबाईंचं, जावयाचं भेटवस्तू देऊन कौतुक केलं जातं.