Mahatma Gandhi Death Anniversary 2020: महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी चं औचित्य साधत पुढच्या पिढीपर्यंत नक्की पोहचवा त्यांचे हे सकारात्मक विचार!

यंदा महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून पुढच्या पिढीपर्यंत त्यांचे विचार पोहचवण्यासाठी सोशल मीडीयामध्ये व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp), फेसबूक (Facebook) च्या माध्यमांतून महात्मा गांधीजींचे विचार शेअर करायला विसरू नका.

Mahatma Gandhi | Photo Credits : Wikimedia Commons

Mahatma Gandhi Marathi Quotes:  मोहनदास करमचंद गांधी (Mohandas Karamchand Gandhi) म्हणजेच महात्मा गांधी (Mahatma Gandhi) या व्यक्तिमत्त्वाचं गारूड केवळ भारतामध्ये नव्हे तर परदेशातही आहे. जगातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, लोकप्रिय नेत्यांमध्ये महात्मा गांधींजींची गणती केली जाते. सुमारे 150 वर्ष ब्रिटिश सत्तेखाली दबलेल्या भारतीयांना शांतता, अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळावे म्हणून संघटीत करण्याची किमया गांधीजींनी साधली. ब्रिटीशांची सत्ता उलथून लावण्यासोबतच गरीबी, महिलांचे अधिकार, सामाजिक एकता, बंधुता जपण्यासोबत अस्पृश्यतेला दूर ठेवत स्वराज्याचा आनंद भारतीयांना मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. यंदा महात्मा गांधींजींची 72 वी पुण्यतिथी (Mahatma Gandhi Death Anniversary)  आहे. यानिमित्ताने त्यांनी प्रत्येक लहान मोठ्या संघर्षात आपल्याला नव्या उमेदीने लढायला शिकवणारी काही तत्त्व, अनमोल विचारांचा ठेवा दिला आहे. शांतता, अहिंसा या मार्गाने जर तुम्ही लढाई जिंकायचा प्रयत्न करत असाल तर महात्मा गांधींचे हे प्रेरणादायी विचार नक्की पुढच्या पिढी पर्यंत पोहचवा. आज (30 जानेवारी) महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचे विचार व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक, इंस्टाग्रामच्या माध्यमातून सोशल मीडियामध्ये नक्की शेअर करा. भारतामध्ये महात्मा गांधी जयंती हा दिवस शहीद दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. Martyrs’ Day Significance: 30 जानेवारी हा दिवस शहीद दिन म्हणून का साजरा केला जातो? जाणून घ्या यामागचे कारण.  

असहकार आणि अहिंसा या तत्त्वाचा वापर करून सत्याग्रहाच्या मदतीने महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून दिला. 1915 मध्ये भारतात परत आल्यानंतर गांधींजींनी भारत छोडो, असहकार चळवळ, दांडी यात्रा यांची सुरूवात केली. भारताला ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीमधून मुक्त करण्यासाठी शांततेच्या मार्गाने लढायला शिकवणार्‍या युगापुरूषाचे हे विचार आजही तुम्हांला नवी उर्जा देतील.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार

Mahatma Gandhi Quotes | File Photo
Mahatma Gandhi Quotes | File Photo
Mahatma Gandhi Quotes | File Photo
Mahatma Gandhi Quotes | File Photo

स्वातंत्र्यलढ्यासाठी भारतीयांमध्ये एकजूट निर्माण करण्यासोबतच शेतकरी, कष्टकरी यांचे प्रश्न सोडवण्यातही महात्मा गांधीजींनी पुढाकार घेतला होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही फाळणीमुळे दुरावलेले हिंदू-मुस्लिम एकत्र आणण्यासाठी,दोन्ही समाजात शांताता, सामंजस्य रहावे म्हणूनही गांधीजींनी प्रयत्न केले. मात्र दिल्लीत 30 जानेवारी 1948 दिवशी नथुराम गोडसेंनी हत्या केली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now