Laxmi Pujan 2020 HD Images: लक्ष्मी पूजनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी Wishes, Messages, Greetings आणि शुभेच्छापत्र देऊन साजरा करा दीपावलीचा सण

Laxmi Pujan (Photo Credits-File Images)

Laxmi Pujan 2020 HD Images: दिव्यांचा सण म्हणून ओळख असणाऱ्या दीपावलीचा आज पहिलाच दिवस. सर्वत्र दिव्यांची आरास, घरापुढे रांगोळी, दरवाज्याला गोंड्याचे तोरण लावून दिवाळी पहाटची सुरुवात होते. तर आज दिवाळीचा सण आणि लक्ष्मी पूजन एकत्रितपणे साजरी केली जाणार आहे. लक्ष्मी पूजनावेळी देवी लक्ष्मी, कुबेर आणि गणेशाची पूजा केली जाते. तसेच घरात सुख,समृद्धी आणि शांतता कायम रहावी यासाठी प्रार्थना ही केली जाते. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी पूजन केले जाणार आहे. (Laxmi Pujan 2020 Date: यंदा लक्ष्मी पूजन कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी)

तर यंदाच्या लक्ष्मी पूजनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी Wishes, Messages, Greetings आणि शुभेच्छापत्र देऊन साजरा करा दीपावलीचा सण. (Happy Diwali 2020 Messages in Marathi: दिपावलीच्या शुभेच्छा Greetings, WhatsApp Status द्वारे देऊन मंगलमयी वातावरणात करा दिवसाची सुरुवात!)

Laxmi Pujan (Photo Credits-File Images)
Laxmi Pujan (Photo Credits-File Images)
Laxmi Pujan (Photo Credits-File Images)
Laxmi Pujan (Photo Credits-File Images)
Laxmi Pujan (Photo Credits-File Images)
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीला फराळाचा आणि लाह्या-बत्तास्यांचा नैवेद्य दाखवला जातो. आपल्या घरात लक्ष्मीचे वास्तव्य कायम राहावे, अमावस्येला ‘लक्ष्मी’ आणि ‘कुबेर’ या देवतांचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे तर, कुबेर हा संपत्ती संग्रहक असल्याचे म्हटले जाते. तसेच या खास दिवशी नवीन केरसुणीची पूजा केली जाते. या केरसुणीने घरातील कचरा बाहेर टाकला जातो तसाच आपल्यातील वाईट सवयी, विचार बुद्धिबाहेर टाकले जावेत यासाठी प्रार्थना केली जाते.धार्मिक मान्यतेनुसार, घरात उत्साह, स्वच्छता, सौंदर्य, आनंद पाहून लक्ष्मी सर्वत्र संचार करते, म्ह्णून या दिवशी आनंदी आणि निश्चिन्त असणे आवश्यक आहे.