Lalbaugcha Raja 2021: यंदा लालबागचा राजा दिमाखात विराजमान होणार, राज्य सरकारच्या गाइडलाइन्सनुसार गणेशोत्सवाचा सोहळा पार पडणार

मात्र यावेळी राज्य सरकारने जाहीर केलेल्या कोविड19 च्या गाइडलाइन्सनुसारच गणेशोत्सवाचा सोहळा पार पाडला जाणार आहे.

Lalbaugcha Raja (Photo Credits: Twitter)

Lalbaugcha Raja 2021:  कोरोनाची परिस्थिती आणि दुसऱ्या बाजूला अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने गाइडलाइन्स जाहीर केल्या होत्या. त्यामुळे यंदा सुद्धा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात यावा असे ही गाइडलाइन्समध्ये सांगण्यात आले आहे. परंतु मुंबईची शान असलेला लालबागचा राजा हा दिमाखात विराजमान होणार असल्याचे समोर आले आहे. मात्र यावेळी राज्य सरकारने जाहीर केलेल्या कोविड19 च्या गाइडलाइन्सनुसारच गणेशोत्सवाचा सोहळा पार पाडला जाईल असे ही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.(Ganpati Special ST Bus: गणेशोत्सवासाठी 2200 ST Buses ची सोय; 'या' तारखेपासून बुकींगला सुरुवात)

गेल्या वर्षी सुद्धा कोरोनाची स्थिती असल्याने राजाची मुर्ती स्थापन करण्यात आली नव्हती. अत्यंत साधेपणाने गणेशोत्सवाचा सोहळा पार पाडला गेला. मात्र तेव्हा रक्तदान शिबीर आणि विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आले होते. मात्र यंदा आता भाविकांना लालबागच्या राजाचे दर्शन घेता येणार आहे. परंतु यावेळी कोरोनाचे सक्तीने नियम पाळून सर्व काही गोष्टी केल्या जाणार आहेत. (Ganeshotsav 2021 Guidelines: घरगुती गणपतीची मूर्ती 2 फूटांची असावी; 'गणेशोत्सवा'साठी राज्य सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना)

महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक गावात सार्वजनिक गणपती मंडळे अगदी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करतात. या दहा दिवसांमध्ये पुण्या-मुंबई सारख्या शहरांचे तर संपूर्ण रूपच पालटते. मात्र यंदाही अशा मंडळांवर अनेक मर्यादा आल्या आहेत. सध्या तर देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढा देत आहे व पुढे तिसरी लाट येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे यंदाही गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. राज्यात कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, शासनाने या उत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.