Kumbh Mela 2019 : प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभ मेळ्यात क्रुजचा आनंद घ्या, जाणून घ्या किंमत

गेल्या काही वर्षांपूर्वी पेक्षा यंदाचा कुंभ मेळ्याचा सोहळा खूप भव्य आणि आकर्षित असणार आहे.

कुंभ मेळा, 2019 (फोटो सौजन्य-ट्विटर)

Kumbh Mela 2019 : प्रयागराज (अलाहाबाद) येथे 15 जानेवारी रोजी कुंभ मेळा, 2019 च्या धार्मिक सोहळ्याला सुरुवात होणार आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी पेक्षा यंदाचा कुंभ मेळ्याचा सोहळा खूप भव्य आणि आकर्षित असणार आहे. त्यामुळे भाविकांसाठी जल मार्ग, वायू मार्ग आणि वाहतूक सेवेची उपलब्धता करुन देण्यात आली आहे. तसेच कुंभ मेळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकाला प्रयागराज येथील आजूबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यायची असल्यास क्रुजची व्यवस्था करण्यात आली आहे.

भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरण म्हणजेच इन्लँड वॉटरेज अथॉरिटी ऑफ इंडियाने प्रयागराज येथे 5 जानेवारी पासूनच मोटरबोट्स आणि क्रुज राईड करण्यासाठी सज्ज झाले आहे. प्राधिकरणाची दोन जहाज सीएल कस्तुरबा आणि एसएल कमला सोबत 20 मोटरबोट्स भाविकांसाठी एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. (हेही वाचा -Kumbh Mela 2019 : कुंभमेळ्यासाठी जिओने लाँच केला खास ‘कुंभ जिओफोन’; जाणून घ्या काय आहेत फीचर्स)

प्रयागराज येथे गंगा आणि यमुना नदीवर क्रुजची सुविधा योग्य रितीने होण्यासाठी 4 फ्लोटिंग टर्मिनल्स बनविण्यात आले आहेत. तसेच क्रुज सुविधेबद्दल बोलायचे झाले तर क्रुजसाठी 200 रुपये ते 1200 रुपये प्रति व्यक्ती असे दर भाविकांना मोजावे लागणार आहेत.



संबंधित बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024: मुंबई शहर जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी विशेष सुविधा; जाणून घ्या कुठे नोंदवू शकाल तुमच्या मागण्या

Mumbai Healthcare Facilities: मुंबईत मधुमेह सर्वात प्राणघातक आजार, सार्वजनिक दवाखान्यांची कमतरता; Praja Foundation ने प्रसिद्ध केला शहरातील आरोग्य समस्यांवर प्रकाश टाकणारा धक्कादायक अहवाल

Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्यभरात स्थापन होणार 1 लाख 427 मतदान केंद्रे; आदिवासी आणि दुर्गम भागांतील मतदारांसाठी विशेष सुविधा, 'अशी' आहे तयारी

Israeli Airstrikes Target Iran's Missile Production: इराणच्या क्षेपणास्त्र निर्मिती केंद्रांवर इस्रायली हवाई हल्ले, नव्या उपग्रह छायाचित्रांचा खुलासा