Happy Kojagiri Purnima Wishes: कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठमोळी ग्रीटिंग्स, SMS, Messages, GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून साजरी करा शरद पौर्णिमा!
हॅप्पी कोजागिरी पौर्णिमा!
Happy Sharad Purnima 2019 Marathi Messages & Wishes: अश्विन पौर्णिमेची रात्र कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima) म्हणून साजरी केली जाते. शरद पौर्णिमा (Sharad Purnima), कौमुदी व्रत, कुमार पौर्णिमा, रास पौर्णिमा अशा विविध नावांनी कोजागिरी पौर्णिमा ओळखली जाते. कोजागिरीची रात्र जागवून हिंदू धर्मीय लक्ष्मी आणि इंद्राची आराधना करतात. वैभवप्राप्ती आणि चांगल्या आरोग्यासाठी कोजागिरीच्या रात्री व्रत केले जाते. आटीव दूधाचा नैवैद्य बासुंदी, खीर, मसाला दूध अशा रूपात दाखवला जातो. मग अशा या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा व्हॉट्सअॅप स्टेट्स, फेसबूक मेसेजेसच्या माध्यमातून देण्यासाठी आम्ही मराठमोळी शुभेच्छापत्र तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. कोजागिरीच्या शुभेच्छा, शरद पौर्णिमेच्या मराठी शुभेच्छा खास मेसेजेस, व्हॉट्सअॅप स्टेट्स, ग्रीटिंग्स, SMS यांच्या माध्यमातून शेअर करून या सणाचा आनंद द्विगुणित करा. Kojagiri Purnima 2019 Date: कोजागिरी पौर्णिमा दिवशी लक्ष्मी पूजनाची शुभ वेळ आणि महत्त्व काय?
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी चंद्रमंडलातून खाली भूतलावर येते आणि जी व्यक्ती जागी असेल तिला वैभवप्राप्तीचा आशिर्वाद देते अशी अख्यायिका आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो. त्यामुळे शरदाच्या चांदण्यासोबत चंद्राच्या शीतल प्रकाशाचा आनंद घेत यंदाची कोजागिरी पौर्णिमेची रात्र तुमच्या प्रियजनांसोबत, कुटुंबासोबत, मैत्र मैत्रिणींसोबत नक्की साजरी करा.
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
शरदाचं टिपुरं चांदणं, कोजागिरीची रात्र
चंद्राच्या मंद प्रकाशात, करू जागरण एकत्र
मसाले दूधाचा गोडवा, नात्यांमध्ये येऊ दे
आनंदाची उधळण, आपल्या जीवनातही होऊ दे
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात
सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य
घेऊन येणारी ठरो! हीच आमची कामना
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
मंद प्रकाश चंद्र-चांदण्यांचा
सोबतीला आस्वाद गोड दुधाचा,
विश्वास वाढु द्या नात्यांचा
सोबत गोडवा असू द्या साखरेचा,
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
चंद्राच्या साक्षीने मिळाली मसाले दुधाची मेजवानी
कोजागिरी रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
आज कोजागिरी पौर्णिमा
हा सण तुम्हाला सुख-समाधानकारक
आनंदाची उधळण करणारा जावो हीच सदिच्छा
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरी पौर्णिमा व्हॉट्सअॅप स्टिकर्स
आजकाल आबालवृद्धांमध्ये व्हॉट्सअॅप हे मेसेजिंग अॅप प्रामुख्याने वापरलं जातं. शुभेच्छापत्र, HD Greetings, Images प्रमाणेच आता व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या माध्यमातूनही शुभेच्छा दिल्या जातात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कस्टमाईज्ड व्हॉट्सअॅप स्टिकर्स बनवू शकता. त्याच्या माध्यमातूनही मराठमोळ्या अंदाजात कोजागिरीच्या शुभेच्छा देऊ शकता.
कोजागिरी पौर्णिमा 2019 व्हिडिओ मेसेज
यंदा 13 ऑक्टोबरच्या रात्री कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. भारताच्या विविध प्रांतांमध्ये कोजागिरी पौर्णिमा विविध अंदाजात साजरी केली जाते. महाराष्ट्रात कोजागिरी व्रत केले जाते. रात्री चंद्राच्या कोमल प्रकाशात दूध आटवून मसाले दूध, बासुंदी असे विविध गोडाचे पदार्थ बनवून कोजागिरीची रात्र साजरी केली जाते.