Karwa Chauth 2020 Puja Samagri List: करवा चौथ पूजेच्या ताटामध्ये 'या' गोष्टी आहेत आवश्यक; जाणून घ्या पूजा सामग्रीची संपूर्ण यादी

या व्रताची सर्व तयारी एक ते दोन दिवस अगोदरपासूनचं सुरू होत असते. जेणेकरून उपवासाच्या दिवसात कोणतीही अडचण येऊ नये. हिंदू दिनदर्शिकेनुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला, स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी करवा चौथ व्रत (Karwa Chauth Vrat) पाळतात. चौथ पूजेच्या ताटात साहित्याची यादी जाणून घेऊयात...

Karwa Chauth 2020 Puja Samagri List (Photo Credits: Instagram)

Karwa Chauth 2020 Puja Samagri List: अखंड सौभाग्याचा सण करवा चौथ (Karwa Chauth) उद्या म्हणजेचं बुधवार 4 नोव्हेंबर ला साजरा होणार आहे. या व्रताची सर्व तयारी एक ते दोन दिवस अगोदरपासूनचं सुरू होत असते. जेणेकरून उपवासाच्या दिवसात कोणतीही अडचण येऊ नये. हिंदू दिनदर्शिकेनुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला, स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी करवा चौथ व्रत (Karwa Chauth Vrat) पाळतात. या दिवशी भगवान शिव (Lord Shiva), माता पार्वती (Mata Parvati), भगवान गणेश (Lord Ganesha) यांच्यासह करवा मातेची पूजा केली जाते. त्यानंतर रात्री चंद्र देवतेला आणि पतीला चाळणीतून पाहून व्रताची सांगता होते. या दिवशी महिला साज श्रृंगार करतात. त्यानंतर पतीच्या हाताने जल प्राशन करून अन्न सेवन करतात.

करवा चौथ दरम्यान पूजेच्या ताटाला विशेष महत्त्व आहे. या ताटात पूजेशी संबंधित सर्व आवश्यक साहित्य ठेवले जाते. जर तुम्हीही करवा चौथच्या दिवशी उपवास करणार असाल, तर तुमच्या पूजेच्या ताटामध्ये कोणते साहित्य हवे? हे खालील यादीच्या साहाय्याने तुम्ही जाणून घेऊ शकता. उद्याच्या उपवासाची आजच तयारी केल्यास तुम्हाला उद्या पूजेच्या ताटातील साहित्याची एकजूट करण्याची आवश्यकता भासणार नाही. चला तर मग करवा चौथ पूजेच्या ताटात साहित्याची यादी जाणून घेऊयात... (हेही वाचा - Karwa Chauth Recipes : या करवा चौथ ला घरी बनवा 'हा' स्पेशल गोड पदार्थ आणि घरच्यांना करा खुश )

करवा चौथसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंची संपूर्ण यादी -

करवा चौथचे व्रत दिल्ली, हरियाणा, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, जम्मू, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यात पाळलं जातं. विवाहित महिला आपल्या पतीच्या दिर्घआयुष्यासाठी हे व्रत करतात. या व्रताची सुरूवात महिला सूर्योदयाच्या अगोदर सरगी खाऊन करतात. सरगीमध्ये मिठाई, सेवईं, कोरडी फळे, नारळपाणी, पुरी किंवा पराठे, रस इत्यादींचा समावेश होतो. सरगी खाल्ल्यानंतर, महिला दिवसभर उपवास करतात आणि रात्री चंद्राचे दर्शन करून उपवास सोडतात.