India Republic Day 2022 Google Doodle: भारताचा प्रजासत्ताक दिन निमित्त Google ने साकारलं सांस्कृतिक वारशाची झलक असलेलं खास Doodle

आज भारताचा प्रजासत्ताक दिन 73 वं वर्ष साजरं करत आहे. त्यानिमित्त भारतीयांना शुभेच्छा देण्यासाठी गूग़लनेही खास Republic Day parade मधील घटकांचा वापर करत खास डूडल साकारलं आहे.

Indian Republic Day 2022 Google Doodle| Google Homepage

आज भारताचा प्रजासत्ताक दिन (Indian Republic Day). या खास दिवसानिमित्त  गूगलनेही (Google)  डूडलच्या (Doodle) माध्यमातून भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. आजच्या गूगल डूडल वर भारतीय संस्कृतीमधील सैन्याची ताकद, कला आणि सांगितिक वारशाचा मेळ घालत खास गोष्टींद्वारा गूगल हा शब्द साकारण्यात आला आहे. यामध्ये तबला, उंट, सेक्सोफोन, घोडे, हत्ती यांचा समावेश करण्यात आला आहे.  दरम्यान याच सार्‍या गोष्टी राजपथावर होणार्‍या रिपब्लिक डे परेड मध्ये देखील समाविष्ट असतात. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीमध्ये होणार्‍या या परेडचा दिमाखदार सोहळा यंदा देखील बघण्याजोगा आहे.

दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी दिवशी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण झाल्यानंतर राजपथावर सैन्यदलाकडून देशाच्या सांस्कृतिक वारशाची प्रतिबिंब खास परेड द्वारा दाखवली जाते. यंदा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर त्यामध्ये थोडे बदल करत ही परेड मर्यादित स्वरूपात होणार आहे. पूर्वी दीड लाख लोकांच्या उपस्थिती मध्ये होणारा हा सोहळा यंदा अवघ्या 25 हजारांच्या उपस्थितीत होत आहे. मात्र याचं ऑनलाईन स्ट्रिमिंग दाखवले जाणार आहे. हे देखील नक्की वाचा: Happy Republic Day 2022 Wishes in Marathi: 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा संदेश, WhatsApp Status, Messages शेअर करत व्यक्त करा देशाभिमान! 

सांस्कृतिक कलाविष्कारांसोबतच 25 राज्यांचे चित्ररथ देखील राजपथावर संचलन करणार आहेत. महाराष्ट्राच्या चित्ररथावर यावर्षी  ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी होणार असल्याची माहिती, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. हे देखील नक्की वाचा: Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर भव्य संचलन; घडणार लष्करी सामर्थ्य आणि सांस्कृतिक विविधतेचे दर्शन, जाणून घ्या कसा असेल सोहळा .

भारतामध्ये 150 वर्ष ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून जनतेची सुटका झाल्यानंतर लोकशाही स्थापन झालेल्या देशात भारत सरकारने 26 जानेवारी 1950 या दिवशी भारतीय जनतेला हे संविधान सुपूर्त केले. लाहोर येथील अधिवेशनात पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी 26 जानेवारी 1930 या दिवशी तिरंगा फडकावत संपूर्ण (स्वातंत्र्याची) घोषणा केली. या दिवसाची आठवण म्हणूनच 26 जानेवारी या दिवशी संपूर्ण भारतात राज्य घटना अंमलात आणण्याचा दिवस ठरवला गेला. तेव्हापासून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now