Karwa Chauth 2020 : जर तुम्ही पहिल्यांदाच करवा चौथचे व्रत करणार असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा
ज्या यंदा पहिल्यांदा करवा चौथ चा उपवास करणार असतील. परंतु फिल्मी करवा चौथ आणि पारंपारिक करवा चौथ यांच्यात बराच फरक आहे त्यामुळे पहिल्यांदा उपवास करणाऱ्या सुहासिन महिलेला देखील करवा चौथचे उद्दीष्ट, महत्त्व, आध्यात्मिक पैलू आणि परंपरा समजून घेणे आवश्यक आहे.हे खुप कठीन व्रत समजले जाते.तेव्हा हे व्रत कसे करायचे ते नीट समजून घ्या.
Karwa Chauth 2020 : लग्नानंतर प्रत्येक नवविवाहित महिलेची अशी इच्छा असते की ती पतीच्या तब्येत आणि दीर्घायुष्यासाठी करवा चौथचा उपवास करेल कोणत्याही कुमारीसाठी करवा चौथ उपवास आनंदी स्वप्नांच्या प्राप्तीपेक्षा कमी नाही. मुळात, हा उपवास फक्त लग्न झालेल्या महिला ठेवतात म्हणून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील असंख्य महिला असतील ज्या यंदा पहिल्यांदा करवा चौथ चा उपवास करणार असतील. परंतु फिल्मी करवा चौथ आणि पारंपारिक करवा चौथ यांच्यात बराच फरक आहे त्यामुळे पहिल्यांदा उपवास करणाऱ्या सुहासिन महिलेला देखील करवा चौथचे उद्दीष्ट, महत्त्व, आध्यात्मिक पैलू आणि परंपरा समजून घेणे आवश्यक आहे.हे खुप कठीन व्रत समजले जाते.तेव्हा हे व्रत कसे करायचे ते नीट समजून घ्या. (Karwa Chauth Mehndi Design 2020 : करवा चौथसाठी 'या' सोप्या आणि आकर्षक मेहंदी डिजाईन नक्की ट्राय करा )
असे करा व्रत
हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक महिन्यातील कृष्णपक्ष दिवशी कर्वा चौथ व्रत पाळले जाते. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार, करवा चौथ यावेळी 4 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाईल. या दिवशी सुहासिन स्त्रिया सकाळी उठतात ,स्नान करतात त्यानंतर ध्यान करतात आणि करवा चौथसाठी उपवास ठेवतात. यानंतर अन्न आणि पाणी न घेता दिवसभर उपवास ठेवा आणि भगवान शिव, देवी पार्वती आणि करवा महारानी यांची सायंकाळी 6 ते 8 दरम्यान गणेशासह पूजन करा. गणपतीच्या पूजेच्या मंत्राचा जप करुन धूप दीप लावा.
पूजेच्या शेवटी, करवा चौथची पारंपारिक कथा ऐकण्याचा आणि सांगण्याची प्रथा देखील आहे. यानंतर, रात्री चंद्र पाहिल्यानंतर, त्याचे दर्शन घ्या आणि त्याला अर्घ्य अर्पण करा आणि चंद्राला प्रार्थना करा, की तुमचा पती नेहमीच निरोगी आणि दीर्घायुषीराहू दे आणि प्रगती करु दे.अर्घ्य दान केल्यावर ब्राह्मणांना सर्व वस्तू, फळे, मिठाई आणि अन्न कपड्यांचे दान केल्यावर व्रतच पारण करा.
हिंदू धर्मग्रंथांमध्ये असेही सांगितले गेले आहे की जर उपवासठेवणाऱ्या स्त्रीची तब्येत ठीक नसेल नसेल किंवाती स्त्री गर्भवती असेल तर तिने निर्जल उपवास न ठेवता ती फलहार करू शकते. तिला करवा राणीचे पूर्ण पुण्य आणि आशीर्वाद प्राप्त होतील.
करवा चौथ च्या सोळा श्रृंगार चे रहस्य
करवा चौथ चे व्रत करणाऱ्या महिलेला 16 श्रृंगार करुन सांध्यकाळच्या शुभ मुहूर्तावर भगवान श्रीगणेशजी, शिव, पार्वती, आणि करवा महारानी यांची पूजा करावी आणि चंद्रांना अर्घ्य द्यावे.सोळा श्रृंगारातील मुख्य गोष्टी म्हणजे मुख्य वस्तू म्हणजे लाल रंगाची साडी किंवा लेहेंगा (तुम्हाला जे काही घालायचे आहे ते), सिंदूर, मंगळसूत्र, बिंदी, नथनी, काजळ, गजरा, मेहंदी, अंगठी, बांगड्या, कानातले,मांग टीका,कमरपट्टा ,बाजूबंद , आणि एंकलेट्स. असे मानले जाते की माता गौरीला सोळा शोभा अधिक आवडतात आणि ती सोळा शृंगार केलेल्या सुहागनच्या उपवासाने खूप खुश होते.
पौराणिक व्रत कथा
करवा नावाची एक गर्विष्ठ महिला नदीच्या काठी असलेल्या खेड्यात आपल्या पतीबरोबर राहत होती. एक दिवस तिचा नवरा नदीत स्नान करायला गेला. आंघोळ करताना, एका मगरीने त्याचा पाय धरला आणि तो खोल पाण्याकडे खेचू लागला. त्या माणसाने आपल्या बायकोला 'करवा. . करवा म्हणायला सुरुवात केली. त्याचा आवाज ऐकून त्यांची पत्नी करवा तिथे आली आणि तेथे जाऊन त्यांनी त्या मगरीला कच्च्या धाग्याने बांधले. मगर बांधल्यानंतर ती यमराजच्या दरबारात पोहचली आणि यमराजला म्हणाली - हे देवा! मगरीने माझ्या पतीचा पाय पकडला आहे. (Karwa Chauth 2020 Mehndi Design : करवा चौथ ला आपल्या हाता-पायांवर काढा या सुंदर आणि आकर्षक मेहंदी डिजाइन)
करवा चौथ पूजनाचा शुभ मुहूर्त
ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते, 4 नोव्हेंबर रोजी, संध्याकाळी 05.34 ते सायंकाळी 06.52 या वेळेत उपासनेचा शुभ वेळ आहे. सायंकाळी 7.57 वाजता चंद्रोदयचा योग आहे. यानंतर, चंद्राचे दर्शन करुन त्याला अर्घ्य अर्पण करा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)