Holi 2021 HD Images: होळीच्या दिवशी खास Wishes, Messages, Greetings, Facebook, Whatsapp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा होलिका दहनाचा दिवस
या सणादिवशी संपूर्ण भारतात होळी पेटवून होलिकादहन केले जाते. यंदा 28 मार्च 2021 रोजी होळी साजरी करण्यात येणार आहे. दृष्ट प्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करुन चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी देशभरात होळीचा (Holi 2021) सण साजरा केला जातो. या सणादिवशी संपूर्ण भारतात होळी पेटवून होलिकादहन केले जाते. यंदा 28 मार्च 2021 रोजी होळी साजरी करण्यात येणार आहे. दृष्ट प्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करुन चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश. महाराष्ट्रात होळी दहनासाठी लाकडे, झाडाच्या फांद्या समिधा म्हणून मंत्रोच्चारात जाळण्यात येतात आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखविला जातो. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची पद्धती रूढ आहे.
होळी सणाबद्दल महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली आख्यायिका म्हणजे, भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने होलिकादेवतेला पाठवले होते. तिचा श्रीविष्णू देवाने वध केला होता. होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले. म्हणूनच या दिवशी होलिका दहन केले जाते. तर अशा या होळीचे औचित्य साधून HD Images, Greetings, Wishes, Messages, Facebook आणि Whatsapp Status शेअर करून शुभेच्छा देऊ शकता.
(हेही वाचा: Holi 2021: यंदाची होळी असेल खास; ग्रहांच्या स्थितीमुळे निर्माण होत आहेत शुभ योग, जाणून घ्या सविस्तर)
होळीच्या दुसर्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो, यावेळी एकमेकांना होळीची राख लावली जाते. होळीनंतर 5 दिवसांनी रंगपंचमी साजरी केली जाते. होळीचे वर्णन खूप आधीपासून आपल्याला पाहायला मिळते. प्राचीन विजयनगर साम्राज्याची राजधानी हम्पीमध्ये सोळाव्या शतकातील चित्र मिळाले आहे ज्यात होळीचा उल्लेख आहे. तर असा हा मनुष्याला, आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी असे सांगणारा हा सण सर्वांना सुखाचा, समृद्धीचा जाओ.