Valentine’s Day 2020 Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' च्या शुभेच्छा मराठी रोमॅन्टिक Greetings, Messages, GIFs, HD Images च्या माध्यमातून शेअर करून स्पेशल करा तुमच्या साथीदाराचा आजचा दिवस

Happy Valentine’s Day Marathi Wishes | File Image

Happy Valentine’s Day 2020 Marathi Wishes:  आज 14 फेब्रुवारी हा दिवस जगभरात प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे  चं सेलिब्रेशन बद्दल जगभरात तरूणाईला विशेष आकर्षण असतं. 14 फेब्रुवारी दिवशी व्हॅलेंटाईन डे  (Valentine’s Day) सेलिब्रेट करण्यापूर्वी आठवडाभर रोमॅन्टिक सेलिब्रेशन करतात. यामध्ये 7 फेब्रुवारीला 'रोझ डे' (Rose Day) पासून सुरूवात होते तर 13 फेब्रुवारीला 'किस डे' (Kiss Day) असतो. 14 फेब्रुवारी दिवशी व्हेलेंटाईन डेचं सेलिब्रेशन असतं. फेब्रुवारी महिना सुरू झाल्यानंतर आपोआपच गिफ्ट शॉप्स आणि फ्लॉवर मार्ट्समध्ये तयारीला सुरूवात होते. आठवडाभर तरूणाई आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीचा या व्हेलेंटाईन वीक मधील प्रत्येक दिवस खास करण्यासाठी एकमेकांसाठी सरप्राईज प्लॅन करतात. गिफ्ट्स देऊन प्रत्येक दिवस विस्मरणीय करण्याचा प्रयत्न करतात. मग यंदाच्या व्हॅलेंटाईन डे  ची सुरूवात तुमच्या गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडला व्हॉट्सअ‍ॅप मेसेज, स्टेट्सच्या माध्यमातून मराठी रोमॅन्टिक Messages, Wishes, Love Quotes, SMS, GIFs आणि HD Images द्वारा देण्यासाठी ही काही शुभेच्छापत्रं नक्की मदत करतील. Valentine Day 2020 Horoscope: कोणत्या राशींना यंदाचा व्हॅलेनटाईन डे असणार खास, जाणून घ्या तुमचे भविष्य.  

संत व्हॅलेंटाईन डे  यांच्या स्मरणार्थ जगभरात 14 फेब्रुवारी दिवशी व्हेलेंटाईन डे साजरा केला जातो. 3 र्‍या शतकात सम्राट क्लाऊडियसला निषेध करत संत व्हेलेंटाईन यांनी जोडप्यांचं लग्न लावलं. त्याच्या या कृत्यानिमित्त व्हेलेंटाईनला जेलमध्ये टाकण्यात आले आणि 14 फेब्रुवारी 270 साली त्याला फासावर लटकवण्यात आले. संत व्हेलेंटाईन यांनी प्रेमासाठी दिलेल्या या बलिदानाची आठवण म्हणून प्रत्येक वर्षी 14 फेब्रुवारीला 'व्हेलेंटाईन डे' साजरा केला जातो. मग यंदा तुमच्यासोबतच तुमच्या जोडीदाराचा व्हेलेंटाईन डे खास करण्यासाठी प्रेमाची कबुली देऊन एकमेकांसाठी खास सरप्राईज प्लॅन करा आणि या दिवसाचं आनंद द्विगुणित करा. Valentine Day 2020 Gift Ideas: प्रेमाचा गुलाबी दिवस समजल्या जाणा-या व्हॅलेंटाईन डे ला तुमच्या जोडीदाराला द्या भेटवस्तू म्हणून 'या' Useful गोष्टी

व्हॅलेंटाईन डे  2020 रोमॅन्टिक शुभेच्छा

प्रेम या दोन अक्षरातच जीवनाचा खरा अर्थ दडला आहे

या अर्थाच्या शोधातच एक जीव दुसर्‍यावर जडला आहे !

Happy Valentine's Day My Love!

Happy Valentine’s Day Marathi Wishes | File Image

हसणे तुझे ओठांवरचे गुलाबापरी फुलताना

सुटती कोडी आयुष्याची तुझ्या मीठीत असताना

Happy Valentine's Day

Happy Valentine’s Day Marathi Wishes | File Image

तुझ्यावर रूसणं, रागावणं

मला कधीच जमलंच नाही

कारण तुझ्याशिवाय माझं मन

दुसर्‍या कुणात कधी रमलंच नाही!

Happy Valentine's Day

Happy Valentine’s Day Marathi Wishes | File Image

मनातले शब्द न शब्द तुलाच सांगायचे आहेत भविष्याचे वेध

कवेत तुला घेऊनच घ्यायचे आहेत

रंगवलेली स्वप्ने सत्यात साकारायची आहेत

फक्त मला प्रिये... त्यासाठी, साथ तुझी हवी आहे...

Happy Valentine’s Day!

Happy Valentine’s Day Marathi Wishes | File Image

व्हेलेंटाईन डे GIFs

via GIPHY

via GIPHY

व्हेलेंटाईन डे 2020 हाप्रेमाचा दिवस असल्याने तुमच्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी तो अधिक स्पेशल करा. प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हेलेंटाईन डे या केवळ एका दिवसाची गरज नाही परंतू किमान या एका दिवसाचं औचित्य साधून तुमच्या साथीदाराचा दिवस स्पेशल करण्यासाठी थोडं खास प्रयत्न करा. अनेकदा मनातल्या भावना स्पष्टपणे न सांगितल्याने गैरसमजुती वाढतात म्हणूनच यंदा तुमचं प्रेम मनमोकळेपणे व्यक्त करून व्हेलेंटाईन डे सेलिब्रेट करा. लेटेस्टली मराठी कडून तुम्हांला Valentine’s Day च्या खूप सार्‍या शुभेच्छा!