Rama Navami 2019: 'राम नवमी'च्या शुभेच्छा WhatsApp, Facebook Status च्या माध्यमातून देणारी खास मराठी, इंग्रजी भाषेतील SMS, Wishes, Quotes, Images आणि शुभेच्छापत्र
चैत्र शुद्ध नवमी दिवशी श्रीराम नवमी साजरी केली जाते. या दिवशी राम भक्त दुपारी बारा वाजता राम मंदिरा मध्ये राम जन्म उत्सव साजरा करतात.
Ram Navami Marathi, English Wishes: चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे ‘राम नवमी’ (Rama Navami) देशभरात चैत्र शुद्ध नवमी दिवशी श्रीराम नवमी साजरी केली जाते. या दिवशी राम भक्त दुपारी बारा वाजता राम मंदिरा मध्ये राम जन्म उत्सव साजरा करतात. या दि वशी काही जण केवळ दिवसभर उपवास करतात तर काही जण केवळ रामाचे दर्शन घेतात. राम भजन-कीर्तनामध्ये मन रमवतात. या दिवसचा आनंद द्विगुणित करायचा असेल तर तुमच्या जवळच्या राम भक्तांना व्हॉट्सअॅप मेसेज (WhatsApp), फेसबूक मेसेंजर (Facebook Messager) आणि इतर सोशल मीडिया माध्यमातून राम नवमीच्या शुभेच्छा देणारी शुभेच्छापत्र, ग्रिटिंग्स,मेसेज नक्कीच शेअर करू शकता. Ram Navami 2019: गदिमा-सुधीर फडके यांनी साकारलेलं 'गीत रामायण' नेमकं कसं तयार झालं?
राम नवमीच्या शुभेच्छा
राम नवमी शुभेच्छा व्हिडिओ
राम हा मर्यादा पुरूष म्हणून ओळखला जातो. जगाच्या कल्याणासाठी.अनिष्ट दूर करण्यासाठी भगवान विष्णूंनी जे दहा अवतार घेतले त्यापैकी सातवा अवतार म्हणजे श्रीराम. पुत्रकामेष्टी यज्ञ केल्यानंतर रामाचा जन्म झाला. त्याचा उत्सव गुढीपाडव्यापासून सुरू होतो आणि चैत्र शुद्ध नवमी दिवशी संपतो.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)