Makar Sankranti 2021 Images: मकर संक्रातीनिमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन आपले मित्र आणि नातेवाईकांना द्या गोड शुभेच्छा!

भारतीय संस्कृतीत जवळपास दर महिन्याला एक सण साजरा केला जातो. मकर संक्रांती (Makar Sankranti 2021) हा सण वर्षाचा पहिला सण म्हणून साजरा केला जातो.

भारत हा सणवारांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृतीत जवळपास दर महिन्याला एक सण साजरा केला जातो. मकर संक्रांती (Makar Sankranti 2021)  हा सण वर्षाचा पहिला सण म्हणून साजरा केला जातो. मकर संक्रांतीला तीळ आणि गूळ यांचे लाडू किंवा वड्या करण्याची पद्धत आहे. यामागे भूतकाळात झालेल्या कडू आठवणींना विसरून त्यात तीळ आणि गूळ यांचा गोडवा भरायचा असे म्हटले जाते. मात्र, भारतासह संपूर्ण देशात कोरोनाचे संकट वावरत आहे. यामुळे यावर्षीची मकर संक्राती कोरोनाच्या निर्बंधाखाली आणि सोशल डिस्टन्सिंग पालन साजरी करत साजरी करावी लागणार आहे. Makar Sankranti 2021 Wishes in Marathi: मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी SMS, Quotes, WhatsApp Stickers द्वारा शेअर करून द्विगुणित करा आनंद.

मकर संक्रांत हा सण केवळ भारतातच साजरा होतो असे नाही. तर आशिया खंडातील अनेक ठिकाणी तो साजरा केला जातो. नेपाळमध्ये याला माघी किंवा माघी संक्रात, थायलंड मध्ये सोंग्क्रान, लाओस मध्ये पी मा लाओ आणि म्यानमार मध्ये थिंगयान असे म्हंटले जाते. भारतात देखील याला लोहरी, मकर संक्रांती, पोंगल इत्यादी नावे आहेत. या सणाला गुजरात आणि राजस्थान राज्यांमध्ये पतंगाचा सण म्हणून ओळखले जाते. यावर्षी कोरोना महामारीमुळे मकर संक्रातीच्या शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे शेजाऱ्यांच्या घरी जाऊन तिळ आणि गूळ देता येणार नाही. परंतु, तुम्ही आपले मित्र-परिवार आणि नातेवाईकांना खाली दिलेले एचडी इमेज पाठवून  त्यांची मकर संक्रात आणखी गोड करू शकतात. हे देखील वाचा- Makar Sankranti Special Halwyache Dagine: मकर संक्रांती करता लहान मुले व महिलांसाठी घरी बनवा 'हे' आकर्षक हलव्याचे दागिने, Watch Videos

मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा-

मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा-

मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा-

मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा-

भारतासह संपूर्ण जगभरात कोरोनाचे जाळे पसरले आहे. यामुळे अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम रद्द किंवा लॉकडाऊनच्या निर्बंधांखाली साजरी करावी लागली आहेत. महत्वाचे म्हणजे, कोरोनावर शंभर टक्के गुणकारी ठरेल, अशी लस अद्याप विकसित झाली नाही. यामुळे प्रत्येकाने तोंडावर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पालन करणे गरजेचे आहे.