Guru Nanak Jayanti 2019: गुरु नानक देव जी यांनी सुरु केलेल्या लंगर परंपरेविषयीचे महत्व जाणून घ्या

कार्तिक पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी शीख धर्माचे संस्थापक आणि शीखांचे पहिले धर्मगुरु, गुरु नानक देव जी (Guru Nanak Dev Ji) यांचा जन्म झाला होता. या खास दिवशी शीख धर्मातील लोक गुरु नानक जयंती, गुरुपुरब, गुरु पर्व आणि प्रकाश पर्व साजरे करतात

गुरु नानक जयंती 2019 (Photo Credits: File Photo)

कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला हिंदू धर्मातील लोकांसह शीख धर्मातील लोकांसाठी फार महत्वाचा मानला जातो. कार्तिक पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी शीख धर्माचे संस्थापक आणि शीखांचे पहिले धर्मगुरु, गुरु नानक देव जी (Guru Nanak Dev Ji) यांचा जन्म झाला होता. या खास दिवशी शीख धर्मातील लोक गुरु नानक जयंती, गुरुपुरब, गुरु पर्व आणि प्रकाश पर्व साजरे करतात. गुरु नानक देन जी यांचा जन्म संवत् 1526 मध्ये कार्तिक पौर्णमेला झाला होता. त्यावेळी इंग्रजी दिनदर्शिकेनुसार त्यांचा जन्न 15 एप्रिल 1469 मध्ये पंजाबच्या तलवंडी येथे झाला. जे सध्या पाकिस्तानध्ये स्थित आहे. त्यांचे जन्मस्थान हे ननकाना साहिब यांच्या नावे ओखळले जाते. गुरुनानक देवव जी नेहमीच त्यांच्या प्रवचनांमध्ये जातिवाद, भेदभाव नष्ट करणे, सत्याच्या मार्गावर चालणे आणि सर्वांचा आदर-सन्मान करण्यासारखे मोलाचे उपदेश द्यायचे.

यंदा 12 नोव्हेंबरला गुरुनान यांची 550 वी गुरुनानक जयंती साजरी करण्यात येणार आहे. गुरुनानक जयंतीचे पर्व 15 दिवस आधीपासून सुरु होते. या दरम्यान प्रभात फेरी काढली जात असून घराघरांमध्ये जाऊन शब्द किर्तन केले जाते. शीख धर्मातील कोणताही सण साजरा करण्यासाठी लंगरचे आयोजन केले जाते. लंगर शिवाय गुरुद्वारांमध्ये साजरे होणारे सण संपन्न होत नाहीत.

गुरु नानक देव जी यांनी लंगर परंपरा सुरु केली होती. जवळजवळ 15 व्या शतकात ही लंगर परंपरेचे आयोजन करण्याची सुरुवात केली गेली. गुरुनानक ज्या ज्या ठिकाणी गेले तेथे जमीनीवर बसूनच भोजन करायचे. त्यावेळी जात-पात, उच्च-नीच आणि अंधविश्वास संपवण्याच्या हेतूनेच लंगर ही परंपरा सुरु केली होती. कारण सर्वजण एकत्र बसून जेवण करु शकतात. गुरु नानक देव जी यांनी सुरु केलेल्या या परंपरेला शीख धर्मातील तीसरे गुरु अमरदास जी यांनी पुढे चालू ठेवली असून ती आतापर्यंत कायम आहे.(Guru Nanak Jayanti 2019: 12 नोव्हेंबर ला साजरी होणार गुरु नानक देव यांची 550वी जयंती, शीख धर्माच्या पहिल्या संस्थापकांविषयी 'या' 10 गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?)

देशभरातील कोणत्याही गुरुद्वारामध्ये एखादा सण साजरा करण्यासाठी लंगरचे आयोजन केले जाते. कारण लंगर शिवाय कोणताही सण संपन्न होत नाही. लंगर मध्ये विविध जातीचे आणि धर्माचे लोक एकत्र मिळून सहभागी होतात. जगातील ज्या कानाकोपऱ्यात शीख धर्मीय राहतात तेथे लंगरची प्रथा पाळली जाते. शीख धर्मात आनंदाच्या वेळी, सण, जत्रा आणि गुरु पर्व सारख्या खास दिवसांमध्ये लंगरचे आयोजन केले जाते.

पंजाब मधील अमृतर येथे असलेल्या स्वर्ण मंदिर म्हणजेच गोल्ड टेंम्पल येथे जगातील सर्वात मोठ्या लंगरचे आयोजन केले जाते. येथे हजारोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी रोज जेवण बनवले जाते. तसेच मंदिरात श्रीमंत-गरीब असा भेदभाव कधीच केला जात नाही. कोणत्याही खास उत्सवादरम्यान मंदिराच्या स्वयंपाकगृहात जवळजवळ 2 लाख रोटी बनवल्या जातात.