Ghatasthapana 2022 Shubh Muhurat: घटस्थापना कशी करावी? पूजा विधी आणि शुभ मुहूर्त, जाणून घ्या

परंतु घट स्थापन करण्याची विधी असते तर घटस्थापना नेमकी कशी करावी? त्यासाठी शुभ वेळ, पूजा विधी काय? याबद्दल जाणून घेऊया...

Ghatasthapana 2022 Puja Vidhi (Photo Credits: Instagram)

Ghatasthapana 2022 Puja Vidhi: यंदा 26 सप्टेंबर पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे.  ९ दिवस हा उत्सव सोहळा रंगणार आहे. भारतात साजरा केल्या जाणाऱ्या या ९ दिवसाच्या उत्सवात देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरु होणाऱ्या या उत्सवाची सांगता दसऱ्याने होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते. काही सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांमध्येही घट बसवतात तर काही ठिकाणी देवीची सुंदर मुर्तीही बसवली जाते. मागील 2 वर्षांपासून कोरोनामुळे सध्या पद्धतीने उत्सव साजरे केले जात होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व निर्बंध उठवल्यानंतर उत्साह द्विगुणीत झाला आहे. यंदा गणेशोत्सवाचा सणही थाटात साजरा करण्यात आला आहे. आता अनेकांना उत्सुकता लागली आहे. नवरात्रीची, घरातील घटस्थापना असो किंवा दांडिया, तरुणाई सज्ज झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, घरोघरी घटस्थापना करुन वर्षानुवर्षांची चालत आलेली परंपरा जपली जाईल आणि याही वर्षी अनेकांच्या घरी घट बसवले जातील. परंतु घट स्थापन करण्याची विधी असते तर  घटस्थापना नेमकी कशी करावी? त्यासाठी शुभ वेळ, पूजा विधी काय? याबद्दल जाणून घेऊया...[हे देखील वाचा : Navratri Colours 2022 for 9 Days: 26 सप्टेंबरला घटस्थापनेपासून 4 ऑक्टोबर पर्यंत नऊ रात्रींचे नऊ रंग कोणते?]

घटस्थापना शुभ मुहुर्त (Ghatasthapana 2022 Shubh Muhurat):

यंदा सोमवार, 26 सप्टेंबरला घटस्थापना केली जाईल. या दिवसापासून शारदीय नवरात्रोत्सवाचा प्रारंभ होईल. 

घटस्थापना मुहूर्त - सकाळी 06:11 ते 07:51 पर्यंत. 

घटस्थापना अभिजित मुहूर्त - सकाळी ११:४८ ते दुपारी १२:३६

घटस्थापना पूजा विधी (Ghatasthapana 2022 Shubh Muhurat):

नवरात्रातीत दुर्गेची पूजा ही "निर्मिती शक्तीची" पूजा असते. नवरात्रीतील घटाला सृष्टीचे रुप मानले जाते. या काळात कन्या पूजन करुन देवीच्या रुपाची पूजा केली जाते.