Gauri Pujan 2020 Ukhane: गौरी पूजनाला हमखास होणारा नाव घेण्याचा हट्ट पुरवण्यासाठी महिलांसाठी खास उखाणे !

मग यंदा तुम्ही देखील गौरी पुजनाला घराबाहेर पडताना नावं घेण्यासाठी उखाण्यांची देखील तयारी करून बाहेर पडा.

Gauri Pujan 2020| Photo Credits: Instagram

Jyeshtha Gauri Pujan 2020:  महाराष्ट्रात गणेशोत्सवात मंगलमूर्ती गणरायाची जितकी उत्सुकता असते तितकीच गौराईच्या रूपात येणार्‍या पार्वतीची असते. बाल गणेशाला घेऊन जाण्यासाठी आलेली गौराई गौरी आवाहनाच्या (Gauri Aavahan) दिवशी येते, गौरी पुजनाच्या (Gauri Pujan) दिवशी विराजमान होते तर तिसर्‍या दिवशी विर्सजनाच्या वेळेस आपल्या घरी पुन्हा परतते. त्यामुळे गौराईच्या या सणाला माहेरवाशिणींचा सण देखील म्हटला जातो. या निमित्ताने घरातील लेकी-सुना एकत्र येऊन खेळ खेळतात. गौराईच्या पुजानानिमित्त रात्र जागवतात. नवविवहितेसाठी गौराईचा सण मोठा खास असतो. या दिवशी 5 ओवसं देऊन तीला घरातील ज्येष्ठांकडून आशिर्वाद मिळतात. दरम्यान या सणाच्या निमित्त हमाखास सुवासिनींना ओवसं देताना-घेताना नाव घेण्याचा आग्रह केला जातो. मग यंदा तुम्ही देखील गौरी पुजनाला घराबाहेर पडताना नावं घेण्यासाठी उखाण्यांची देखील तयारी करून बाहेर पडा. Jyeshtha Gauri Pujan 2020: गौरी पूजनाला सौभाग्यवतींसाठी खास असणारं ओवसाचं सूप कसं तयार करतात? जाणून घ्या पुजाविधी

दरम्यान महाराष्ट्रात यंदा गणेशोत्सवाच्या काळात 25 ऑगस्ट दिवशी गौरी आवाहन आहे. म्हणजे प्रथेनुसार या दिवशी गौरी येईल रात्री तिची आकर्षक सजावट केली जाईल. तर दुसर्‍या दिवशी गौरी पुजनाच्या दिवशी ओवसं भरून विधिवत तिची पुजा करून रात्र जागवण्याचा कार्यक्रम केला जाईल. Jyeshtha Gauri Pujan Wishes In Marathi: गौरी पूजनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करून साजरा करा माहेरवाशिणींचा सण.

गौरी पूजनाचे उखाणे

  1. गौरी-गणपती समोर ठेवल्या, पंचपक्वान्नाच्या राशी

    --- नाव घेते, गौरी पुजनाच्या दिवशी

  2. गौराई च्या समोर, ठेवले केशरी पेढे

    __चे नाव घ्यायला, कसले हो आढे-वेढे?

  3. नाही मला द्वेष, मत्सर, नाही हेवा ... चे नाव घेतय ... ची सून सगळ्यांनी लक्ष ठेवा !
  4. उगवला सूर्य, मावळला शशी

    __चे नाव घेते, गौराई पूजनाच्या दिवशी

  5. भरजरी साडीला साजेसा जरतारी खण

    __चे नाव घेते, आज आहे गौरी पूजनाचा सण

महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी तेरड्याच्या पानांची, खड्यांची, पीठाची प्रतिकात्मक गौरी आणून तिची पूजा करण्याची पद्धत आहे. तर आता मूर्तीच्या स्वरूपात देखील गौराई घरा-घरामध्ये विराजमान होतात. यामध्येही काहींकडे एकच मूर्ती असते. तर काही जण ज्येष्ठा- कनिष्ठा अशा दोन गौरी आणून तिचं पूजन करतात. दरम्यान गौरी पूजनाच्यानिमित्ताने काही ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम  देखील आयोजित केला जाते. त्यामध्ये हमखास नाव घेण्याचा आग्रह केला जातो.

गौराई म्हणजे भगवान शंकराची पत्नी आणि गणरायाची आई आहे. हिंदू पुराण कथांनुसार, गौरी बाल गणेशाला शोधत गौरी आगमनाच्या दिवशी पृथ्वीवर येते. 3 दिवसांच्या विसाव्यानंतर गणेशाला ती कैलास पर्वतात पुन्हा घेऊन जाण्यासाठी आलेली असते. त्यामुळे गणरायासोबत त्याच्या आईचं गौराईच्या रूपात स्त्री शक्तीचं पूजन करण्याची पद्धत आहे.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif